Elec-widget

मोहम्मद हफीजने स्वीकारलेला पराभव, पण शोएब अख्तरच्या फोनने बदलले आयुष्य

हफीजला आता सन्मानाने क्रिकेटमधून निवृत्त व्हायचे आहे.

  • Share this:

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुबईतील कसोटी सामन्यात शतकी खेळी खेळणाऱ्या मोहम्मद हफीजने एक मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तान संघात स्थान मिळत नसल्याने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र माजी जलद गोलंदाज शोएब अख्तरने त्याला ही चूक करण्यापासून रोखले.

जवळपास दोन वर्षांनंतर हफीजने पाकिस्तान संघात समावेश केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याने करिअरचे १० वे शतक ठोकले.

पहिल्या दिवसाच्या खेळानंतर त्याने निवृत्ती घेण्याचा निर्णय कसा घेतला होता याबद्दल सांगितले. मोहम्मद म्हणाला की, गेले काही महिने माझ्यासाठी फार त्रासदायक होते. मी फार मोठा निर्णय घेणार होतो. पण माझ्या पत्नीने मला रोखले.

त्या कठीण काळात शोएब अख्तरने हा निर्णय न घेण्यास सांगितले आणि अजून खूप खेळणं बाकी असल्याचा सल्लाही त्याने मला दिला.

त्याच्या याच सल्ल्यावर मी विचार केला आणि स्वतःवर अधिक मेहनत घेतली. मोहम्मदने ट्विटरवर ही माहिती शेअर करत शोएब अख्तरचे आभार मानले.

Loading...

मोहम्मद म्हणाला की, देवाने माझ्यासाठी काहीतरी वेगळेच नियोजित केले होते. मी यावेळी कदाचित कोणी तरी वेगळाच असतो. पण मला मनापासून वाटत होते. क्रिकेट ही एकमेव जागा आहे जिथे मी पुनरागमन करू शकतो.

जेव्हा मी संघात परत आलो तेव्हा सर्व खेळाडूंनी प्रेमाने माझं स्वागत केलं. त्यांच्या या प्रेमातूनच मला सकारात्मकता मिळाली आणि मी चांगला खेळ खेळू शकलो.

मोहम्मद हाफीजने पाचव्यांदा पाकिस्तानच्या कसोटी संघात पुनरागमन केले आहे. हफीजला आता सन्मानाने क्रिकेटमधून निवृत्त व्हायचे आहे. हफीजने पाकिस्तानसाठी ५० कसोटी सामने आतापर्यंत खेळले असून ३४५२ धावा केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 9, 2018 08:32 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...