मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

शोएब अख्तरला Live Show मधील शायनिंग पडली महाग, पाकिस्तानी चॅनेलनं दिली कोट्यावधींंची नोटीस

शोएब अख्तरला Live Show मधील शायनिंग पडली महाग, पाकिस्तानी चॅनेलनं दिली कोट्यावधींंची नोटीस

पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) अडचणीत आला आहे. पाकिस्तान टेलिव्हिजन कॉर्पोरेशननं (PTV) अख्तरला कोट्यावधींची नोटीस दिली आहे.

पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) अडचणीत आला आहे. पाकिस्तान टेलिव्हिजन कॉर्पोरेशननं (PTV) अख्तरला कोट्यावधींची नोटीस दिली आहे.

पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) अडचणीत आला आहे. पाकिस्तान टेलिव्हिजन कॉर्पोरेशननं (PTV) अख्तरला कोट्यावधींची नोटीस दिली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 8 नोव्हेंबर: पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) अडचणीत आला आहे. पाकिस्तान टेलिव्हिजन कॉर्पोरेशननं (PTV) अख्तरला 10 कोटींची नोटीस दिली आहे. मागच्या महिन्यात एका कार्यक्रमात झालेल्या वादानंतर अख्तरनं लाईव्ह कार्यक्रमात राजीनामा  (Shoaib Akhtar On Air Resignation) दिला होता. शोएबनं हा राजीनामा देत कराराचा भंग केल्याचा दावा पीटीव्हीनं केला आहे. शोएबनं या प्रकारावर नाराजी व्यक्त केली असून पीटीव्हीशी कायदेशीर लढाई लढणार असल्याचं जाहीर केलं आहे.

'मी अतिशय निराश झालो आहे. मी पीटीव्हीसाठी काम करत असताना त्यांना माझा सन्मान आणि प्रतिष्ठा याचं संरक्षण करण्यात अपयश आलं. आता त्यांनी मला एक नोटीस पाठवली आहे. मी एक योद्धा आहे. मी हार मानणार नाही. या प्रकरणात कायदेशीर लढाई लढणार आहे.' असं शोएबनं जाहीर केलं आहे.

काय झाला होता वाद?

पाकिस्तानचे न्यूज चॅनल पीटीव्ही (PTV) वरील 'गेम ऑन है' या कार्यक्रमात हा सर्व प्रकार घडला. या कार्यक्रमात मंगळवारी पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) यांच्या मॅचवर चर्चा सुरू होती. यामध्ये वेस्ट इंडिजचे माजी कॅप्टन विवियन रिचर्डसह अनेक माजी खेळाडू सहभागी झाले होते.

शोएब अख्तरनं यावेळी लाहोर कलंदर्स या पाकिस्तानच्या फ्रँचायझीकडून खेळणाऱ्या शाहीन आफ्रिदी आणि हॅरीस राऊफची प्रशंसा केली. या टीममुळेच त्यांचा खेळ बहरल्याचा दावा अख्तरनं केला. त्यानंतर या शो चा होस्ट नौमान नियाजनं अख्तरला अडवत शाहीन आफ्रिदी पाकिस्तानच्या अंडर-19 टीमकडून खेळत असल्याची आठवण केली. त्यावर नौमीन यांना अडवत मी हॅरीस राऊफबद्दल बोलत आहे, असं उत्तर अख्तरनं दिलं.

अख्तरचं हे उत्तर नियाज यांना आवडलं नाही. त्यांनी लाईव्ह कार्यक्रमातच त्याला अपमानित केले. 'तू थोड्या सभ्यतेनं बोल. मला हे बोलण्याची इच्छा नाही, पण तू स्वत:ला ओव्हरस्मार्ट समजत असशील तर या कार्यक्रमातून निघून जाऊ शकतोस. मी तुला हे ऑन एअर सांगत आहे.' असं सुनावलं.

नियाज यांनी त्यानंतर अख्तरच्या बोलण्याकडं दुर्लक्ष करत इतरांना प्रश्न विचारले आणि कार्यक्रमात ब्रेक घेतला. ब्रेकनंतर अख्तरनं हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला पण, नियाज यांनी त्याकडं लक्ष दिलं नाही. अखेर मी पीटीव्हीमधून राजीनामा देत आहे, असं सांगत अख्तर बाहेर पडला.

काय आहे नोटीस?

पीटीव्हीनं अख्तरला नोटीस बजावत 10 कोटी रुपयांची नुकसानभरपाई आणि  3333000 रुपये देण्याची मागणी केली आहे. हे अख्तरचे तीन महिन्यांचे मानधन आहे. अख्तरनं ही भरपाई दिली नाही तर त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा पीटीव्हीनं दिला आहे.

T20 World Cup: टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात येताच विराट कोहलीचं 'ते' ट्विट Viral

First published:

Tags: Pakistan, Shoaib akhtar, T20 world cup