Home /News /sport /

विराट कोहलीला कॅप्टनसी सोडावी लागली, दिग्गज क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा! VIDEO

विराट कोहलीला कॅप्टनसी सोडावी लागली, दिग्गज क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा! VIDEO

विराट कोहलीनं (Virat Kohli) दक्षिण आफ्रिका विरुद्धची टेस्ट सीरिज गमावल्यानंतर टेस्ट टीमची कॅप्टनसी सोडली आहे. या प्रकरणावर अजूनही प्रतिक्रिया उमटत आहेत.

    मुंबई, 23 जानेवारी : विराट कोहलीनं (Virat Kohli) दक्षिण आफ्रिका विरुद्धची टेस्ट सीरिज गमावल्यानंतर टेस्ट टीमची कॅप्टनसी सोडली. यापूर्वी त्याने सप्टेंबर महिन्यात टी20 टीमच्या कॅप्टनपदाचा राजीनामा दिला होता. तर दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्याला वन-डे टीमच्या कॅप्टनपदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर विराट आणि बीसीसीआय यांच्यात वाद निर्माण झाला होता. पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने या प्रकरणात खळबळजनक दावा केला आहे. शोएब सध्या ओमानमधील मस्कतमध्ये लिजंड्स क्रिकेट लीगमध्ये आशिया लॉयन्सकडून खेळत आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना त्याने हा दावा केला. 'विराट कोहलीनं स्वत:हून कॅप्टनसी सोडली नाही. त्याला तसं करण्यास भाग पाडण्यात आले, हे सर्वांना माहिती आहे. त्याच्यासाठी सध्या खडतर कालखंड सुरू आहे. पण, तो मानसिकदृष्ट्या मजबूत खेळाडू आहे. त्याच्या मानसिक क्षमतेवर क्वचितच कुणाला शंका असेल. तो महान क्रिकेटपटू आहे. त्याच्यासाठी अचानक हे सर्व होणे हा धक्का आहे.' असा दावा अख्तरने केला. विराटच्या खराब फॉर्मबद्दलही अख्तरनं यावेळी मत व्यक्त केले. 'तो बॉटम हँडने जास्त खेळतो. तो आऊट ऑफ फॉर्म असताना हे अधिक जाणवते. पण, तो मोठा खेळाडू आहे. त्याने आजवर खूप काही कमवलंय. तो लवकरच पुनरागमन करेल, असा मला विश्वास आहे. त्याने सर्व वाद विसरून फक्त बॅटींगवर लक्ष केंद्रीत करावे. स्वत:ला आणखी श्रेष्ठ सिद्ध करण्याची त्याला संधी आहे.' असा सल्ला अख्तरनं दिला. IND vs PAK : 9 महिने आधीच पाकिस्तानी खेळाडू वाकड्यात शिरला, टीम इंडियाला डिवचत म्हणाला... विराट कोहली हा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कॅप्टन आहे. त्याच्या कॅप्टनसीमध्ये भारतीय टीमनं 40 टेस्ट जिंकल्या. त्याचबरोबर 5 वर्ष भारतीय टीम टेस्टमध्ये नंबर 1 होती.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BCCI, Shoaib akhtar, Virat kohli

    पुढील बातम्या