मुंबई, 17 जुलै : टीम इंडियाचा ऑल राऊंडर शिवम दुबेनं लग्न (Shivam Dube Marriage) गुरुवारी त्याची गर्लफ्रेंड अंजूम खान (Shivam Dube Wife Anjum Khan) बरोबर लग्न केले. शिवमनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत याची माहिती दिली. त्याने यावेळी मुस्लीम पद्धतीनं लग्न केले आणि पत्नी अंजूम खानबरोबर दुवा मागितली.
शिवमनं लग्नानंतर नमाज देखील अदा केली. आम्ही नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. जस्ट मॅरीड 16.7.2021 असं कॅप्शन शिवमनं दिलं आहे. शिवमला लग्नाबद्दल अनेकांनी अभिनंदन केलं आहे. यामध्ये त्याचा टीम इंडियाचा सहकारी श्रेयस अय्यरचाही समावेश आहे. शिवम आणि श्रेयस हे दोघंही मुंबईकडून एकत्र क्रिकेट खेळतात.
We loved with a love which was more than love … And now this is where our forever starts ❤️
Just Married … 16-07-2021 #togetherforever pic.twitter.com/2SlVDNeO2h — Shivam Dube (@IamShivamDube) July 16, 2021
शिवम दुबेच्या लग्नाचे फोटो व्हायरल होताच त्याच्यावर काही नेटीझन्स नाराज झाले. मुस्लीम पद्धतीप्रमाणेच हिंदू पद्धतीनंही लग्न का केले नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला. एकाने तर नुकतेच वेगळे झालेले तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहां आणि त्यांचे पती निखिल जैन (Nusrat Jahan- Nikhil jain) यांची शिवमला आठवण करुन दिली.
निखिल जैन कांड याद है भाई
— Ashutosh Manohar Dubey (@AashutoshForBJP) July 16, 2021
You should have married as per both religions , why only through Muslim tradition , can't understand your love ..
— Kuldeep munshi (@Kuldeepmunshi8) July 16, 2021
टीम इंडियाकडून मिळाली नाही संधी, चहलच्या मित्राचा आयर्लंडकडून इतिहास! 50 वर्षांमधील पहिली घटना
मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा शिवम दुबे विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून (RCB) आयपीएल स्पर्धेत खेळला आहे. त्याला या सिझनमध्ये राजस्थान रॉयल्सने करारबद्ध केले. शिवमनं 13 टी20 आणि एका वन-डेमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व देखील केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Photo viral