मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

शिखर धवनने ऐकवली शायरी, फॅन्स म्हणाले क्या बात, क्या बात! पाहा VIDEO

शिखर धवनने ऐकवली शायरी, फॅन्स म्हणाले क्या बात, क्या बात! पाहा VIDEO

टीम इंडियाचा ओपनर शिखर धवनमध्ये (Shikhar Dhawan) मोठी गुणवत्ता आहे. तो फक्त बॅटींगमध्ये नाही तर डान्स, संगीत आणि शायरीमध्ये देखील प्रवीण आहे.

टीम इंडियाचा ओपनर शिखर धवनमध्ये (Shikhar Dhawan) मोठी गुणवत्ता आहे. तो फक्त बॅटींगमध्ये नाही तर डान्स, संगीत आणि शायरीमध्ये देखील प्रवीण आहे.

टीम इंडियाचा ओपनर शिखर धवनमध्ये (Shikhar Dhawan) मोठी गुणवत्ता आहे. तो फक्त बॅटींगमध्ये नाही तर डान्स, संगीत आणि शायरीमध्ये देखील प्रवीण आहे.

  नवी दिल्ली, 31 मे: टीम इंडियाचा ओपनर शिखर धवनमध्ये (Shikhar Dhawan) मोठी गुणवत्ता आहे. तो फक्त बॅटींगमध्ये नाही तर डान्स, संगीत आणि शायरीमध्ये देखील प्रवीण आहे. धवननं नुकतीच्या प्रसिद्ध शायर अबरार काशिफ (Abrar Kashif) यांची कविता त्याच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवर वाचून दाखवली. धवनची ही शायरी सध्या चांगलीच व्हायरल (Viral) होत आहे. शिखर धवनचे टीम इंडियातील मुख्य सहकारी सध्या मुंबईतील हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहेत. ते बुधवारी इंग्लंडच्या दौऱ्यावर रवाना होतील. धवनची या टीममध्य् निवड झालेली नाही. त्यामुळे तो सध्या घरीच असून सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय आहे. भारतीय टीम जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यावर धवन कॅप्टन असेल अशी शक्यता आहे. श्रीलंका दौऱ्याला अजून वेळ असल्याने धवन फॅन्सना कविता ऐकवत आहे. 'रविवारच्या शायरीसाठी अबरार काशिफ यांची ही माझी आवडती कविता आहे.' असे कॅप्शन धवनने या व्हिडीओला दिले आहे. फॅन्सना धवनची  शायरी आवडली असून त्यांनी त्यावर दिसखुलास प्रतिक्रिया दिल्या आहेत.
  धवनचे बासरी वादन शिखर धवननं काही दिवसांपूर्वी एक पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोकांनी घरामध्येच राहावं असं आवाहन केले होते. धवनने दिल्ली कॅपिटल्सच्या  (Delhi Capitals) अवतारात एक फोटो शेअर केला होता. त्यावर 'घरी राहा नाही तर गब्बर येईल' असं कॅप्शन दिलं होतं. योगायोगाची गोष्ट म्हणजे गब्बर हे धवनचं टोपणनाव आहे.त्यापूर्वी धवननं बासरी वादनाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये त्याने 'होठों से छू लो तुम' हे प्रसिद्ध गाणे वाजवले होते.
  IPL 2021 : उर्वरित स्पर्धेचं वेळापत्रक ठरलं! 'या' तारखेला होणार पहिली मॅच 'धवन कॅप्टन हवा' टीम इंडियाचा फास्ट बॉलर दीपक चहर याने यापूर्वी श्रीलंका दौऱ्यात शिखर धवन कॅप्टन हवा असं मत व्यक्त केले होते. शिखर धवन बऱ्याच काळापासून क्रिकेट खेळत आहे, त्याच्याकडे अनुभवही आहे, त्यामुळे कर्णधार म्हणून तो चांगला पर्याय आहे. सगळे खेळाडू धवनची इज्जत करतात आणि त्याचं ऐकतातही,' असं दीपक चहर म्हणाला होता.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Instagram post, Shikhar dhawan, Video, Viral video on social media

  पुढील बातम्या