Home /News /sport /

IPL 2021 स्थगित होताच शिखर धवननं केलं महत्त्वाचं काम, सहकाऱ्यांसमोर ठेवला आदर्श

IPL 2021 स्थगित होताच शिखर धवननं केलं महत्त्वाचं काम, सहकाऱ्यांसमोर ठेवला आदर्श

टीम इंडियाचा अनुभवी बॅट्समन शिखर धवन (Shikhar Dhawan) यानं बदललेल्या परिस्थितीमध्ये सर्वात महत्त्वाचं काम केलं आहे. धवननं कोरोना लशीचा (corona vaccine) पहिला डोस घेतला आहे.

    नवी दिल्ली, 7 मे : आयपीएल स्पर्धा (IPL 2021) स्थगित होताच भारतीय क्रिकेटपटू आपआपल्या घरी परतत आहेत. टीम इंडियाचा अनुभवी बॅट्समन शिखर धवन (Shikhar Dhawan) यानं बदललेल्या परिस्थितीमध्ये सर्वात महत्त्वाचं काम केलं आहे. धवननं कोरोना लशीचा (corona vaccine) पहिला डोस घेतला आहे. कोरोना लस घेणारा धवन हा टीम इंडियाचा (Team India) पहिला क्रिकेटपटू आहे. यापूर्वी भारतीय टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी लस घेतली आहे. शिखर धवननं आयपीएल स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी सर्वात जास्त 380 रन केले होते.  रन काढण्याच्या शर्यतीमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या धवननं लस घेतल्यानंतर एक ट्विट केलं आहे. "व्हॅक्सिन घेतलं. त्याग, समर्पणासाठी सर्व कोरोनो योद्ध्यांचे आभार. कृपया लाजू नका, लवकरात लवकर लस घ्या. याच माध्यमातून आपण या व्हायरसला हरवू शकतो." असं ट्विट धवननं केलं आहे. ठरलं! डीव्हिलियर्स 'या' मालिकेत करणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन अन्य खेळाडू कधी डोस घेणार? शिखर धवन आणि रवी शास्त्री यांनी पहिला डोस घेतला असला तरी टीम इंडियाचे अन्य खेळाडू कधी डोस घेणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्त्वाखाली भारतीय टीम या महिन्याच्या शेवटी इंग्लंडमध्ये जाणार आहे. त्यानंतर ती सप्टेंबर महिन्यातच परत येईल. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी किंवा परतल्यानंतर खेळाडू कोरोना लस घेणार की त्यांच्यासाठी बीसीसीआय इंग्लंडमध्ये विशेष व्यवस्था करणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona vaccine, Cricket, Shikhar dhawan

    पुढील बातम्या