मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

मुंबई इंडियन्सची जर्सी घालून पाकिस्तान सुपर लीग खेळायला पोहोचला क्रिकेटपटू

मुंबई इंडियन्सची जर्सी घालून पाकिस्तान सुपर लीग खेळायला पोहोचला क्रिकेटपटू

आयपीएल (IPL 2020)चा 13वा मोसम संपला आहे. आयपीएलमध्ये मुंबई (Mumbai Indians) च्या टीममध्ये असणारा शेरफेन रदरफोर्ड (Sherfane Rutherford) पाकिस्तानमध्ये गेला आहे.

    मुंबई, 14 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020)चा 13वा मोसम संपला आहे. फायनलमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma)च्या मुंबई (Mumbai Indians)ने दिल्ली (Delhi Capitals)चा 5 विकेटने पराभव केला. याचसोबत मुंबईने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. आयपीएल संपल्यानंतर बहुतेक खेळाडू त्यांच्या देशात परतले आहेत, तर काही खेळाडू पाकिस्तान सुपर लीग खेळण्यासाठी गेले आहेत. आयपीएलमध्ये मुंबईच्या टीममध्ये असणारा शेरफेन रदरफोर्ड (Sherfane Rutherford) देखील पाकिस्तानमध्ये गेला आहे. पण पाकिस्तानमध्ये गेल्यावरही रदरफोर्ड अजूनही आयपीएलच्याच मूडमध्ये दिसत आहे. पाकिस्तान सुपर लीग खेळण्यासाठी पाकिस्तानात दाखल झालेला शरफेन रदरफोर्ड मुंबईच्या जर्सीमध्ये दिसला. कराची किंग्ज या टीमने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर रदरफोर्डचा फोटो शेयर केला. या फोटोमध्ये रदरफोर्ड विमानतळावर मुंबई इंडियन्सचा लोगो असलेली जर्सी आणि मास्क लावलेला दिसत आहे. हा फोटो ट्विट केल्यानंतर चाहत्यांनीही लगेचच ट्रोल करायला सुरुवात केली. ipl 2020, Sherfane Rutherford, mumabi indians, rohit sharma, Pakistan Super League, psl, cricket, sports news, ipl 2020, आईपीएल 2020, मुंबई इंडियंस, शेरफन रदरफोर्ड, पाकिस्‍तान सुपर लीग, पीएसएल, रोहित शर्मा, क्रिकेट आयपीएलच्या या मोसमात शेरफेन रदरफोर्डला खेळण्याची संधी मिळाली नाही. मुंबईने मागच्यावर्षी दिल्लीकडून शरफेन रदरफोर्डला ट्रेडमध्ये घेतलं. आपल्या पहिल्याच आयपीएलमध्ये रदरफोर्डने दिल्लीकडून 7 मॅच खेळल्या होत्या. दिल्लीला रदरफोर्डने 2 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. रदरफोर्डची बेस प्राईज 40 लाख रुपये एवढी होती. पीएसएलमध्ये कराची किंग्जकडून रदरफोर्डला काही मॅच खेळण्याची अपेक्षा आहे. पीएसएलच्या प्ले-ऑफला 14 नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे, तर फायनल 17 नोव्हेंबरला होईल. पीएसएलचे प्ले-ऑफचे सामने मार्च महिन्यातच होणार होते, पण कोरोना व्हायरसमुळे पीएसएल स्थगित करण्यात आली होती.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या