टी-20 क्रिकेटचे नवे नियम बेकार, शेन वॉटसनचा निशाणा

टी-20 क्रिकेटचे नवे नियम बेकार, शेन वॉटसनचा निशाणा

ऑस्ट्रेलियाचा माजी ऑलराऊंडर शेन वॉटसन (Shane Watson) याने टी-20 क्रिकेटच्या बदलेल्या नियमांवर निशाणा साधला आहे.

  • Share this:

मेलबर्न, 18 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलियाचा माजी ऑलराऊंडर शेन वॉटसन (Shane Watson) याने टी-20 क्रिकेटच्या बदलेल्या नियमांवर निशाणा साधला आहे. आगामी बिग बॅश लीग (Big Bash League) साठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नवीन नियम लागू केले. 10 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या बिग बॅश लीगमध्ये हे तीन नवे नियम वापरण्यात येणार आहे. यामध्ये पावर सर्ज, एक्स फॅक्टर खेळाडू आणि बॅश बूट यांचा समावेश आहे. बिग बॅश लीगचा रोमांच वाढवण्यासाठी केलेले हे नवे नियम बेकार प्रयत्न असल्याची टीका वॉटसनने केली आहे. जर एखादी गोष्ट संपलेली नसताना तिला पुनर्जीवित करण्याची गरज काय? असा सवाल वॉटसनने उपस्थित केला आहे.

बिग बॅश लीगमधल्या नव्या नियमांनुसार मॅचच्या 10व्या ओव्हरनंतर एका एक्स फॅक्टर खेळाडूला वापरण्याची परवानगी असेल. हा खेळाडू एक बॅट्समन किंवा बॉलिंग टीमसाठी एक बॉलरची जागा घेईल, ज्याने एक ओव्हरपेक्षा जास्त बॉलिंग केली नसेल.

पावर सर्ज हा दोन ओव्हरचा पावरप्ले असेल, ज्याला बॅटिंग टीम शेवटच्या 10 ओव्हरदरम्यान कधीही घेऊ शकेल. पावर सर्जदरम्यानच्या दोन ओव्हरमध्ये 30 यार्डच्या बाहेर फक्त दोनच खेळाडू ठेवता येतील. पावर सर्जमुळे प्रत्येक इनिंगच्या सुरुवातीला असणारा 6 ओव्हरचा पावरप्ले 4 ओव्हरचा करण्यात आला आहे.

बिग बॅश लीगमधला आणखी एक नियम बोनस पॉईंट्सशी संबंधित आहे, याला बॅश बूट असं नाव देण्यात आलं आहे. हे पॉईंट्स दुसऱ्या इनिंगच्या 10 ओव्हरनंतर ज्या टीमने पहिल्या 10 ओव्हरमध्ये जास्त रन केले, त्यांना दिला जाईल. आयपीएल (IPL 2020) च्या या मोसमानंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या वॉटसनने या नियमावर टीका केली आहे. हा बदल खेळाला आणखी किचकट करेल, असं वॉटसन म्हणाला आहे.

शेन वॉटसनने ऑस्ट्रेलियाकडून 59 टेस्ट, 190 वनडे आणि 58 टी-20 मॅच खेळल्या आहेत. यामध्ये त्याने 10,950 रन केल्या आणि 291 विकेटही घेतल्या. क्रिकेटचे हे नवे प्रयोग फक्त खेळाडू आणि प्रशिक्षकच नाही, तर प्रेक्षकांनाही गोंधळात टाकेल, असं मत वॉटसनने मांडलं आहे.

Published by: Shreyas
First published: November 18, 2020, 7:21 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading