Home /News /sport /

ऐतिहासिक विजयानंतरही बांगलादेशचा दिग्गज क्रिकेटपटू नाराज, बोर्डाला दिला घरचा आहेर

ऐतिहासिक विजयानंतरही बांगलादेशचा दिग्गज क्रिकेटपटू नाराज, बोर्डाला दिला घरचा आहेर

टी 20 वर्ल्ड कपपूर्वी बांगलादेशची टीम (Bangladesh Cricket Team) जबरदस्त फॉर्मात आहे. त्यांनी आधी ऑस्ट्रेलिया आणि नंतर न्यूझीलंड या दोन देशांना पराभूत करत सर्वांना धोक्याचा इशारा दिला आहे

    मुंबई, 12 सप्टेंबर : टी 20 वर्ल्ड कपपूर्वी बांगलादेशची टीम (Bangladesh Cricket Team) जबरदस्त फॉर्मात आहे. त्यांनी आधी ऑस्ट्रेलिया आणि नंतर न्यूझीलंड या दोन देशांना पराभूत करत सर्वांना धोक्याचा इशारा दिला आहे. बांगलादेशमध्ये झालेल्या या टी20 सीरिजमध्ये यजनान टीमनं आधी ऑस्ट्रेलियाचा 4-1 असा फडशा पाडला. त्यानंतर न्यूझीलंडचा  या ऐतिहासिक विजयानंतरही बांगलादेशचा दिग्गज ऑलराऊंडर शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) नाराज झाला आहे. त्यानं बांगलादेश क्रिकेट बोर्डावरच (BCB) नाराजी व्यक्त केली आहे. शाकिबनं ढाकामधील एका कार्यक्रमात सांगितलं की, 'ज्यांनी बांगलादेशमध्ये मागील 9-10 मॅच खेळल्या. त्यापाैकी जवळपास कुणीही फॉर्मात नव्हते. कुणीही या पिचवर चांगली बॅटींग केली नाही. त्यामुळे आपण या कामगिरीचा फार विचार केला नाही तरच बरं होईल. या पिचवर कोणताही बॅट्समन 10-15 मॅच खेळला तर त्याचं करिअर उद्धवस्त होईल,' असा गंभीर इशारा शाकिबनं दिला आहे. शाकिब पुढे म्हणाला की, ' आमची टीम वर्ल्ड कपच्या 15-16 दिवस आधी ओमानमध्ये असेल. पिच आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यास या वेळेचा मोठा उपयोग होईल. बांगलादेशमधील पिच आणि परिस्थितीचा आमच्यावर काही परिणाम होईल, असं मला वाटत नाही. आम्हाला जिंकण्याची सवय लागलीय. आमच्या मानसिकतेमध्येही बदल झाला आहे. याचा वर्ल्ड कपमध्ये नक्की फायदा होईल.' असा दावा शाकिबनं केला. T20 वर्ल्ड कपच्या मुख्य फेरीत खेळण्यासाठी बांगलादेशला पहिल्यांदा पात्रता फेरीचा अडथळा पार करावा लागणार आहे. बांगलादेशची पहिली लढत 17 ऑक्टोबर रोजी स्कॉटलंड विरुद्ध होणार आहे. IND vs ENG: मँचेस्टर टेस्ट रद्द झाल्यानंतर रवी शास्त्रींची आली पहिली प्रतिक्रिया! आरोपांबद्दल म्हणाले... आयपीएलचा फायदा बांगलादेशचे मुस्तफिजूर रहमान (राजस्थान रॉयल्स) आणि शाकिब अल हसन (कोलकाता नाईट रायडर्स) हे दोन खेळाडू टी20 वर्ल्ड कपपूर्वी आयपीएलमध्ये खेळणार आहेत. आयपीएलमध्ये खेळल्याचाही आम्हाला फायदा होईल. टी20 वर्ल्ड कपमध्ये आमचा हा अनुभव टीमच्या फायद्याचा ठरेल, अशी आशाही शाकिबनं व्यक्त केली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bangladesh cricket team, T20 world cup

    पुढील बातम्या