आफ्रिदी म्हणतो,'पागल है? गेंदबाजी कौन करेगा?'; पाहा VIDEO

आफ्रिदी म्हणतो,'पागल है? गेंदबाजी कौन करेगा?'; पाहा VIDEO

कॅनडात सुरू असलेल्या ग्लोबल टी20 लीगमधील आफ्रिदीच्या फलंदाजीशिवाय त्याच्या शाब्दिक फटकेबाजीचीसुद्धा चर्चा होत आहे.

  • Share this:

ओटावा, 31 जुलै : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीचा दबदबा आजही दिसून येतो. कॅनडात सुरु असलेल्या ग्लोबल टी20 लीगमध्ये शाहिद आफ्रिदीने ब्रॅम्पटन वॉवेल्सकडून खेळताना एडमोंटन रॉयल्सविरुद्ध 40 चेंडूत 81 धावा केल्या होत्या. त्याच्या जोरावर संघाने 27 धावांनी विजय मिळवला. आता त्याच्या बॅटने केलेल्या फटकेबाजीची नाही तर शाब्दीक फटकेबाजीची चर्चा सुरू आहे.

शेवटच्या चेंडूवर शाहीद आफ्रिदी आणि वहाब रियाज मैदानात होते. यावेळी दोघांमध्ये झालेली चर्चा सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. आफ्रिदी स्ट्राइकला असताना दुसऱ्या बाजूला वहाब रियाज खेळत होता. आफ्रिदीने अखेरचा चेंडू फटकावल्यानंतर एक धाव घेतली. त्यानंतर वहाब रियाजने दुसरी धाव घेण्यासाठी विचारलं. त्यावर आफ्रिदीने जे उत्तर दिलं त्यानं सगळेच चक्रावून गेले.

वहाब रियाजने दुसरी धाव घ्यायची का असे विचारताच आफ्रिदी म्हणाला की, पागल है? गेंदबाजी कौन करेगा?

आफ्रिदीने त्याच्या खेळीत 10 चौकार आणि 5 षटाकार मारले. यामुळे वॉवेल्सनं 20 षटकांत 207 धावा केल्या. आफ्रिदीनं फक्त फलंदाजीच नाही तर गोलंदाजीतही एक गडी बाद केला.

Loading...

भारताला मोठा धक्का; पृथ्वी शॉ डोप टेस्टमध्ये दोषी, BCCIनं घातली बंदी

'सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नसता', निवड समितीच्या अध्यक्षांचे गावस्करांना सडेतोड उत्तर

VIDEO: चित्रा वाघ स्वत:च शरद पवारांना उत्तर देतील - मुख्यमंत्री

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Jul 31, 2019 01:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...