शाहिद आफ्रिदीने घरी पाळला सिंह ?

शाहिद आफ्रिदीने घरी पाळला सिंह ?

  • Share this:

पाकिस्तान, 11 जून : पाकिस्तानचा माजी आॅलराऊंडर क्रिकेटर शाहिद आफ्रिदी क्रिकेट जगतात चांगलाच लोकप्रिय आहे. सोशल मीडियावरही त्याचा चांगला चाहता वर्ग आहे. अशातच एका फोटोमुळे शाहीद भलताच चर्चेत आलाय.

त्याचंच झालं असं की, आफ्रिदीला चार मुली आहे. अक्सा, अजवा, अंशा आणि अस्मारा असं या चार मुलींची नाव आहे. शाहीदने आपल्या टि्वटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केलाय. या फोटोमुळे वादळ उठलंय.

या फोटोखाली त्याने लिहिलंय, "आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणे मला चांगलं वाटतं. मी जेव्हा विकेट घेतो त्याची नकल माझ्या मुलीने केलीये. याची आनंद वेगळाच आहे. आणि हो, प्राण्याची काळजी घेणं विसरू नका, ते आपल्या प्रेमा आणि देखभालीसाठी लायक आहे" असं लिहिलंय. पण गमंत म्हणजे, या फोटोत त्याचा मुलीमागे एक सिंह निवांत बसलेला आहे. त्यामुळे शाहीदच्या घरी सिंह आहे हे या फोटोवरून स्पष्ट होतंय. कारण हा फोटो त्याच्याच घरचा आहे. अशाच एका फोटोमध्ये शाहीद हरणीला दूध पाजतोय.

त्याच्या फोटोमुळे टि्वटरवर एकच संशयकल्लोळ उडालाय. शाहीदच्या घरी खरंच सिंह आहे का ?, हा सिंह त्याने पाळला आहे का ?, असे सवाल विचारले जात आहे.

First published: June 11, 2018, 11:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading