• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • शाहिद आफ्रिदीनं निवृत्तीबाबत विराटला दिला महत्त्वाचा सल्ला, रोहितबद्दल म्हणाला...

शाहिद आफ्रिदीनं निवृत्तीबाबत विराटला दिला महत्त्वाचा सल्ला, रोहितबद्दल म्हणाला...

पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदीनं (Shahid Afridi) विराट कोहलीला (Virat Kohli) निवृत्तीबाबत महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

 • Share this:
  मुंबई, 13 नोव्हेंबर : टीम इंडियाचं टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup 2021) अभियान समाप्त झाल्यानंतर विराट कोहलीनं (Virat Kohli) या प्रकारातील कॅप्टनसी सोडली आहे. त्यानं आता बॅटींगवर अधिक लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. विराट लवकरच वन-डे आणि टेस्ट टीमची कॅप्टनसी सोडणार असल्याचे संकेट टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी दिले आहेत. या सर्व विषयावर क्रिकेट विश्वात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या विषयात आता पाकिस्तानचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) यानं देखील उडी मारली आहे. आफ्रिदीनं 'समा टीव्ही' शी बोलताना रोहित शर्माला (Rohit Sharma) टीम इंडियाच्या टी20 टीमचा कॅप्टन करण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. त्याचबरोबर विराट कोहलीनं सर्व प्रकारच्या फॉर्मेटमधून कॅप्टन म्हणून निवृत्ती घ्यावी असा सल्ला दिला आहे. रोहितची केली प्रशंसा आफ्रिदीनं यावेळी रोहित शर्माची जोरदार प्रशंसा केली आहे. 'मी एक वर्ष रोहित सोबत खेळलोय. तो एक जबरदस्त खेळाडू आहे. तो शांतपणे खेळू शकतो, तसंच गरज पडल्यास आक्रमकही होतो. रोहित कॅप्टन म्हणून मानसिक दृष्ट्या अधिक भक्कम आहे. हे त्यानं त्याची आयपीएल फ्रँचायझी असलेल्या मुंबई इंडियन्सकडून खेळताना दाखवून दिलं आहे.' T20 World Cup Final: इंग्लंडला हरवणाऱ्या क्रिकेटपटूचा ऑस्ट्रेलियाला इशारा, म्हणाला... शाहिद आफ्रिदी आयपीएलच्या सुरूवातीला रोहित शर्मासोबत डेक्कन चार्जर्सकडून खेळला होता. विराट कॅप्टनसी सोडेल, अशी मला अपेक्षा होती. त्यानं आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील कॅप्टनसीमधून निवृत्त व्हावं आणि बॅटींगवर लक्ष केंद्रित करावं. तो एक टॉप लेव्हलचा बॅटर आहे.' असं मत आफ्रिदीनं व्यक्त केलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published: