भारतीय क्रिकेटपटूनं घेतला BCCI शी पंगा, निवड समितीवर केले धक्कादायक आरोप

सातत्यानं चांगली कामगिरी करूनही इंडिया एमध्ये निवड न झाल्यानं सौराष्ट्रकडून खेळलेल्या खेळाडूनं ट्विटरवरून निवड समितीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 4, 2019 09:22 AM IST

भारतीय क्रिकेटपटूनं घेतला BCCI शी पंगा, निवड समितीवर केले धक्कादायक आरोप

मुंबई, 04 सप्टेंबर : डोमेस्टिक क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूला आशा असते की चांगली कामगिरी केल्यास एक दिवस भारतीय संघासाठी खेळायला मिळेल. भारतीय संघात येण्यापूर्वी त्यांना इंडिया ए मध्ये खेळवलं जातं. मात्र, सौराष्ट्रच्या खेळाडूंना डावललं गेल्यानं आता एका खेळाडूनं आरोप केले आहेत. सौराष्ट्रचा यष्टीरक्षक शेल्डन जॅक्सनने ट्विटरवर पोस्ट करून निवड समितीवर राग काढला आहे. त्यानं म्हटलं आहे की, सौराष्ट्रच्या खेळाडूंना दुय्यम वागणूक देण्यात आली आहे.

शेल्डनने ट्विटरवर म्हटलं की, सौराष्ट्रनं यावर्षी रणजी ट्रॉफीत अंतिम सामना खेळला. यात हैराण करणारी गोष्ट ही आहे की सर्व स्तरात चांगली कामगिरी करूनही खेळाडूंना इंडिया ए मध्ये स्थान मिळालं नाही. तर रणजी ट्रॉफी खेळण्याची किंमत शून्य आहे का?

निवड समिती लहान प्रदेशातील संघांकडे दुर्लक्ष करते. त्यांच्याकडं गांभीर्यानं पाहत नाही. गेल्या पाच वर्षांपासून सौराष्ट्रनं सितांशु कोटक यांच्या मार्गदर्शनाखाली 3 वेळा फायनलला धडक मारी पण तरीही याचं कौतुक करण्यात आलं नाही असं शेल्डननं म्हटलं आहे.

Loading...

मी प्रश्न उपस्थित करत नाही पण मला वाटतं की चांगली कामगिरी करत असतानाही निवड होत नसेल तर आमच्यात काय कमी आहे हे जाणून घ्यायचं आहे. आमचं क्रिकेट करिअर कोणत्या दिशेनं जात आहे कळत नाही. निवड समितीनं पारदर्शक काम केलं पाहिजे असा सल्लाही शेल्डननं निवड समितीला दिला आहे.

मुसळधार पावसामुळे सायनमध्ये गुडघाभर पाणी साचलं, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 4, 2019 09:22 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...