बकरी ईदला बैलाची कुर्बानी देणार 'हा' क्रिकेटपटू, खरेदी करत असलेला VIDEO VIRAL

बकरी ईदला बैलाची कुर्बानी देणार 'हा' क्रिकेटपटू, खरेदी करत असलेला VIDEO VIRAL

येत्या 12 ऑगस्टला बकरी ईद असून मोठ्या संख्येन कुर्बानी दिली जाते.यासाठी बैल खरेदी करत असताना क्रिकेटपटूचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • Share this:

कराची, 04 ऑगस्ट : पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद वर्ल्ड कपनंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बकरी ईदनिमित्त तो बैलाचा बळी देणार आहे. यासाठी आपल्या मुलासोबत बैलाची खरेदी करण्यासाठी गेला होता. तेव्हाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पाकिस्तानी माध्यमांनी याबाबतचं वृत्त दिलं आहे. 12 ऑगस्टला बकरी ईद असून कुर्बानीसाठी मोठ्या संख्येनं बकरी आणि बैल यांची खरेदी केली जाते. पाकिस्तानमध्ये याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत सर्फराज अहमद आणि त्याचा मुलगा दिसत आहे. कुर्बानीसाठी बैल खरेदी करत असताना सर्फराज अहमद दिसत आहे. या व्हिडिओवरून सर्फराजवर पुन्हा टीका करण्यात येत आहे. भारताविरुद्धच्या पराभवानंतर तर चाहत्यांनी अत्यंत खालच्या पातळीत सर्फराजवर टीका केली होती.

सर्फराज अहमदच्या नेत़ृत्वाखाली पाकिस्तान वर्ल्ड कपमध्ये खेळला होता. मात्र, या स्पर्धेत त्यांना अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नाही. त्यामुळं त्याचं नेतृत्व धोक्यात आहे. त्याच्याकडून कसोटी संघाचे नेतृत्व काढून घेतलं जाण्याची शक्यता आहे. सर्फराज कर्णधार असतानाच पाकिस्तानने 2017 मध्ये भारताला पराभूत करून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती.

पाकिस्तान हे इस्लामिक राष्ट्र असून तिथं बैलाचा बळी दिला जातो. पाकिस्तानमध्ये गाय आणि बैलाच्या बळी देण्यासा बंदी नाही. भारतात बैलाचा बळी देणं कायद्यानं गुन्हा असला तरी पाकिस्तानमध्ये मात्र ही सामन्य गोष्ट आहे.

Published by: Suraj Yadav
First published: August 4, 2019, 10:27 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading