मुंबई, 9 जुलै: यूएई आणि ओमान या देशांमध्ये ऑक्टोबर महिन्यात टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) सुरु होत आहे. टीम इंडियाला 2007 नंतर ही स्पर्धा जिंकण्यात अपयश आलं आहे. या वर्ल्ड कपची तयारी आता सुरु झाली आहे. टीम इंडियाचा श्रीलंका दौरा अनेक तरुण खेळाडूंसाठी या वर्ल्ड कपच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
या वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) ही जोडी भारतीय इनिंगची सुरुवात करणार आहे. इंग्लंड विरुद्धच्या शेवटच्या टी20 मॅचमध्ये ही जोडीच ओपनिंगला उतरली होती. त्याचवेळी विराट कोहलीनं हे संकेत दिले होते. 'टी20 वर्ल्ड कपमध्ये विराट- रोहित जोडी ओपनिंग करणार असेल तर सूर्यकुमार यादव हा तिसऱ्या क्रमांकासाठी आदर्श बॅट्समन आहे,' असे मत माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजेरकरनं (Sanjay Manjrekar) व्यक्त केलं आहे.
सूर्यकुमार या शर्यतीमध्ये सर्वात आघाडीवर आहे. केएल राहुलबाबत त्यांची योजना काय आहे, हे मला माहिती नाही. पण सूर्यकुमारला टीममध्ये जागा द्यायला हवी. त्याने आयपीएलमधील संपूर्ण सिझनमध्ये प्रभावशाली बॅटींग केली आहे, असे मांजरेकरने सांगितले.
ZIM vs BAN : बॅट्समननं 'ब्रेक डान्स' करताच बॉलर अंगावर धावून गेला, पाहा पुढे काय झालं VIDEO
संजू सॅमसन की इशान किशन?
मांजेरकरनं टी 20 वर्ल्ड कपच्या टीममध्ये संजू सॅमसनच्या (Sanju Samson) जागी इशान किशनला (Ishan Kishan) पसंती दिली आहे. 'टेस्ट मॅचपेक्षा टी20 मॅचमध्ये विकेटकिपरचं महत्त्व कमी आहे. या प्रकारात चांगल्या बॅट्समन आवश्यक आहे. सॅमसनला सूर सापडल्यावर तो अविश्ववसनीय बॅटींग करतो. त्यावेळी त्याच्यापेक्षा बेस्ट कुणी नसतं. पण, माझ्यासाठी सातत्य महत्त्वाचं आहे. मी याच कारणामुळे संजू सॅमसनच्या जागी इशान किशनची निवड करेल.'असे मांजरेकरने स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Suryakumar yadav