मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

मांजरेकरांचं होणार पुनरागमन, BCCI ने IPL मधून केलं होतं बाहेर

मांजरेकरांचं होणार पुनरागमन, BCCI ने IPL मधून केलं होतं बाहेर

आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) पुन्हा एकदा पुनरागमन करणार आहेत. बीसीसीआय (BCCI)ने संजय मांजरेकर यांना आयपीएल (IPL 2020) च्या कॉमेंट्री पॅनलमधून बाहेर ठेवलं होतं

    मुंबई : आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) पुन्हा एकदा पुनरागमन करणार आहेत. बीसीसीआय (BCCI)ने संजय मांजरेकर यांना आयपीएल (IPL 2020) च्या कॉमेंट्री पॅनलमधून बाहेर ठेवलं होतं, त्यामुळे मांजरेकर आयपीएलमध्ये कॉमेंट्री करताना दिसले नाहीत. पण आता आयपीएल संपल्यानंतर भारतीय टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे, या दौऱ्यासाठी मांजरेकर कॉमेंट्री करताना दिसणार आहेत. सोनी पिक्चर्सने संजय मांजरेकर यांच्यासोबत करार केला आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार मांजरेकर यांनी याला दुजोरा दिला आहे. पण सोनी पिक्चर्सने अजून या सीरिजसाठीच्या कॉमेंट्री टीमची घोषणा केलेली नाही. सोनी भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं प्रक्षेपण करणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत 3 वनडे, 3 टी-20 आणि 4 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. 27 नोव्हेंबरपासून भारताच्या वनडे सीरिजला सुरुवात होईल. मांजरेकर यांच्याशिवाय सोनीसाठी गावसकर, हर्षा भोगले, मायकल क्लार्क, ग्लेन मॅकग्रा आणि एन्ड्र्यू सायमंड्स हेदेखील कॉमेंट्री करताना दिसणार आहेत. मांजरेकर-बीसीसीआय वाद मांजरेकर आणि बीसीसीआय यांच्यात सध्या सारं काही ठीक सुरू नाही, त्यामुळेच बीसीसीआयच्या कोणत्याच कॉमेंट्री पॅनलमध्ये ते दिसत नाहीत. मागच्या वर्ल्ड कपदरम्यान मांजरेकर यांनी रविंद्र जडेजाबाबत काही वक्तव्य केली होती. तसंच अनेकवेळा भारतीय क्रिकेटपटूंबाबतही त्यांनी काही मत व्यक्त केली होती, ज्यामुळे बीसीसीआयने त्यांना कॉमेंट्री पॅनलमधून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या