Home /News /sport /

संजय मांजरेकरने नोंदवला अश्विनबद्दल आक्षेप, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केली बोलती बंद!

संजय मांजरेकरने नोंदवला अश्विनबद्दल आक्षेप, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केली बोलती बंद!

माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) नेहमी त्याच्या वक्तव्याबद्दल चर्चेत असतो. मांजरेकरने आता टीम इंडियाचा प्रमुख स्पिनर आर. अश्विन (R. Ashwin) बद्दल आक्षेप घेतला आहे.

    मुंबई, 6 जून: माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) नेहमी त्याच्या वक्तव्याबद्दल चर्चेत असतो. क्रिकेट वर्ल्ड कप 2019 च्या दरम्यान रविंद्र जडेजाबद्दल (Ravindra Jadeja) केलेलं त्याचं ट्विट चांगलंच वादग्रस्त ठरलं होतं. जडेजापाठोपाठ मांजरेकरनी आता टीम इंडियाचा मुख्य स्पिनर आर. अश्विन (R. Ashwin) याला लक्ष्य केले आहे. आर. अश्विन हा 'ऑल टाईम ग्रेट' बॉलर आहे, या वक्तव्यावर मांजरेकरने आक्षेप नोंदवला आहे. अश्विनची कामगिरी दमदार नाही संजय मांजरेकरनी सांगितले की, "काही जण त्याला (अश्विन) ऑल टाईम ग्रेट बॉलर समजतात. माझा त्यावर आक्षेप आहे. अश्विननं SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) या देशांमध्ये एकदाही पाच पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या नाहीत. भारतीय पिचवरील त्याच्या कामगिरीचा विचार केला तर मागील चार वर्षांमध्ये जडेजानं त्याच्या बरोबरीनं विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंड विरुद्ध झालेल्या सीरिजमध्ये अक्षर पटेलनं (Axar Patel) अश्विनपेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. 'क्रिकइन्फो' वरील कार्यक्रमात मांजरेकर बोलत होता. मांजरेकरची बोलती बंद ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू इयन चॅपेल (Ian Chappell) याने मांजेरकराच्या या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला. चॅपेलने अश्विनची तुलना वेस्ट इंडिजचा महान फास्ट बॉलर जोएल गार्नरशी केली. "गार्नरच्या कामगिरीचा विचार केला तर त्याने कमी वेळाच पाच विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा रेकॉर्डही फार प्रभावशाली वाटणार नाही. याचे कारण म्हणजे त्याच्या टीममध्ये आणखी तीन प्रभावशाली बॉलर होते. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय बॉलर्सची कामगिरी चांगली झाली आहे. त्यामुळे त्यांच्या विकेट्समध्ये विभागणी होते." असे चॅपेलने स्पष्ट केले. WTC Final : न्यूझीलंडला हरवण्याची जय्यत तयारी, तिसऱ्याच दिवशी टीम इंडिया मैदानात चॅपेलने सध्याच्या काळातील पाच सर्वश्रेष्ठ टेस्ट बॉलर्समध्ये अश्विनसह इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि कागिसो रबाडाला जागा दिली आहे. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्सला त्याने या यादीमध्ये पहिला क्रमांक दिला आहे. इशांत शर्माच्या गेल्या तीन वर्षातील कामगिरीवर चॅपेल प्रभावित झाला आहे. इशांतने 2018 पासून 22 टेस्टमध्ये 77 विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा स्पिनर नॅथन लायन आणि अश्विन यामध्ये चांगला बॉलर कोण? असा प्रश्न चॅपेलला विचारला त्यावेळी त्यांनी अश्विन चांगला असल्याचे सांगितले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, R ashwin

    पुढील बातम्या