Home /News /sport /

शोएब मलिकच्या ऐतिहासिक विक्रमानंतर सानिया मिर्झाची भावुक प्रतिक्रिया

शोएब मलिकच्या ऐतिहासिक विक्रमानंतर सानिया मिर्झाची भावुक प्रतिक्रिया

पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) याने ऐतिहासिक विक्रम केला आहे. शोएब मलिकच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्याची पत्नी आणि भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) हिने त्याच्या साठी भावनिक पोस्ट लिहिली आहे.

    लाहोर, 12 ऑक्टोबर : पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) याने ऐतिहासिक विक्रम केला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये 10 हजार रनचा टप्पा ओलांडणारा शोएब मलिक हा पहिला आशियाई क्रिकेटपटू ठरला आहे. शोएब मलिकच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्याची पत्नी आणि भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) हिने त्याच्या साठी भावनिक पोस्ट लिहिली आहे. 'दीर्घ, संयमी, कठोर परीश्रम, त्याग आणि विश्वास, शोएब मलिक मला तुझा अभिमान आहे', असं ट्विट सानिया मिर्झाने केलं आहे. टी-20 क्रिकेटमध्ये 10 हजार रनचा टप्पा ओलांडणारा शोएब मलिक हा जगातला तिसरा खेळाडू आहे. याआधी क्रिस गेल आणि कायरन पोलार्ड यांनी या विक्रमाला गवसणी घातली होती. पाकिस्तानच्या नॅशनल टी-20 स्पर्धेतमध्ये शोएब मलिकने 10 हजार रनचा टप्पा गाठला. खैबर पखतुनख्वाकडून खेळताना मलिकने बलुचिस्तानविरुद्ध 44 बॉलमध्ये 74 रन केले. हा विक्रम केल्यानंतर शोएब मलिकनेही ट्विटरवरून त्याच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. 'टी-20 क्रिकेटमध्ये 10 हजार रन पूर्ण करणारा मी पहिला आशियाई खेळाडू झालो आहे, याबद्दल पाकिस्तानच्या जनतेचं अभिनंदन. यापुढेही मी असाच खेळेन, अशी आशा आहे. मी हा विक्रम कायमच माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या माझ्या पालकांना समर्पित करतो. माझे वडिल जिवंत असते, तर त्यांना आज खूप आनंद झाला असता. पण आयुष्य असंच असतं. मैदानात जायच्या आधी नेहमी मी आईला फोन करतो आणि तिचे आशीर्वाद घेतो,' असं ट्विट मलिकने केलं. शोएब मलिक याने त्याचे सहकारी खेळाडू, मैदानातले कर्मचारी, चाहते यांचेही आभार मानले आहेत. शोएब मलिकने त्याच्या टी-20 कारकिर्दीत 395 मॅचमध्ये 37.41 ची सरासरी आणि 125.71 च्या स्ट्राईक रेटने 10,027 रन केल्या आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार असणाऱ्या शोएब मलिकने 2019 वर्ल्ड कपनंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, पण तो अजूनही टी-20 क्रिकेट खेळत आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या