मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ball Tampering प्रकरणात ऑस्ट्रेलियन बॉलर्सना डिव्हिलियर्सने फटकारले, म्हणाला...

Ball Tampering प्रकरणात ऑस्ट्रेलियन बॉलर्सना डिव्हिलियर्सने फटकारले, म्हणाला...

"ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सना बॉल टेम्परिंगबद्दल Ball Tampering माहिती नव्हते, हे शक्यच नाही. हे सर्व बकवास आहे.'' असा दावा डिव्हिलियर्सनं केला आहे.

"ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सना बॉल टेम्परिंगबद्दल Ball Tampering माहिती नव्हते, हे शक्यच नाही. हे सर्व बकवास आहे.'' असा दावा डिव्हिलियर्सनं केला आहे.

"ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सना बॉल टेम्परिंगबद्दल Ball Tampering माहिती नव्हते, हे शक्यच नाही. हे सर्व बकवास आहे.'' असा दावा डिव्हिलियर्सनं केला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 19 मे : ऑस्ट्रेलियाचा बॉलर कॅमेरुन बेनक्रॉफ्टनं (Cameron Bancroft) दिलेल्या एका मुलाखतीनंतर तीन वर्षांपूर्वीच्या बॉल टॅम्परिंग प्रकरणानं  (Ball Tampering) पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सना या प्रकरणाची माहिती होती, असा आरोप बॅनक्रॉफ्टनं केला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्या टेस्टमध्ये सहभागी झालेल्या बॉलर्सनी तो आरोप फेटाळला. पॅट कमिन्स (Pat Cummins), जॉश हेजलवूड (Josh Hazellwood), मिचेल स्टार्क (Mitchell Starc) आणि नॅथन लायन (Nathan Lyon) यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत या प्रकरणाची काहीही माहिती नसल्याचा दावा केला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा माजी फास्ट बॉलर फॅनी डिव्हिलियर्स (Fanie de Villiers) यानं या योजनेची माहिती संपूर्ण ऑस्ट्रेलियन टीमला होती, असा दावा केला आहे. डीव्हिलियर्स त्या मॅचमध्ये कॉमेंट्री करत होता. त्यानेच टीव्ही क्रू ला बॉलची छेडछाड होत असल्याबद्दल सतर्क केले होता. त्यानंतर बॅनक्रॉफ्ट बॉलला सँडपेपर रगडताना कॅमेऱ्यात कैद झाला.

संपूर्ण टीमला माहिती होते

डीव्हिलियर्सनं या विषयावर 'इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना सांगितलं, "ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सना बॉल टेम्परिंगबद्दल माहिती नव्हते, हे शक्यच नाही. तुम्ही बॉलिंग करताना बॉल पाहाता, त्याला साफ करता आणि नंतर तो बॉल टाकता. त्यामुळे हे सर्व बकवास आहे.

या प्रकरणाला ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डानं व्यवस्थित हातळले नाही. त्यांनी फक्त 2 ( वास्तविक 3) जणांना गुन्हेगार सिद्ध करुन या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ती एक सामूहिक कृती होती. त्याबद्दल कोचला माहिती होते. सिस्टीममधील सर्वांनाच माहिती होते. या गोष्टी टीमपासून लपवता येत नाहीत. बॉलर्सना ही गोष्ट माहिती नसणे अशक्य आहे. त्यांना बॉलमधील फरक लगेच जाणवतो." असे डिव्हिलियर्सने स्पष्ट केले.

कोरोना लस घेतल्यानंतर कुलदीप यादव अडचणीत, प्रशासनाचे चौकशीचे आदेश

ऑस्ट्रेलियन बॉलर्स काय म्हणाले?

बॅनक्रॉफ्टच्या आरोपानंतर ऑस्ट्रेलियन बॉलर्सनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले आहे. न्यूलंड्स टेस्टमध्य बॉलशी छेडछाड झाल्याबद्दल आम्हाला काहीही माहिती नव्हती. आमच्या प्रामाणिकपणाचा आम्हाला अभिमान आहे. जुने खेळाडू आणि पत्रकारांनी यावर प्रश्न उपस्थित केले, त्यामुळे आम्हाला त्रास झाला आहे. या विषयावर आम्ही खूपवेळा उत्तरं दिली आहेत. पण पुन्हा एकदा आमची बाजू मांडावी आणि तथ्य समोर आणावं, असं आम्हाला वाटलं. बॉलची स्थिती बदलण्यासाठी एखादी गोष्ट मैदानात आणली गेली, हे आम्हाला माहिती नाही. आम्हीही स्टेडियममध्ये लागलेल्या स्क्रीनवरच याचा फोटो बघितला,' असं ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सनी सांगितलं आहे.

First published:

Tags: Australia, Cricket, South africa