Home /News /sport /

सलमान खानच्या क्रिकेट टीममध्ये पाकिस्तानी खेळाडूची निवड, क्रिस गेल 'स्टार'

सलमान खानच्या क्रिकेट टीममध्ये पाकिस्तानी खेळाडूची निवड, क्रिस गेल 'स्टार'

बॉलीवूड आणि क्रिकेट यांचं नातं तसं जुनचं आहे. मग ते लग्न असो किंवा एखादी टीम विकत घेणं असो, बॉलीवूड स्टार अनेक वेळा क्रिकेटच्या मैदानात दिसून येतात. आयपीएलमध्ये शाहरुख खान आणि प्रीती झिंटा यांच्या मालकीच्या दोन टीम आहेत. आता यामध्ये सलमान खान (Salman Khan) याचं नावही जोडलं गेलं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 21 ऑक्टोबर : बॉलीवूड आणि क्रिकेट यांचं नातं तसं जुनचं आहे. मग ते लग्न असो किंवा एखादी टीम विकत घेणं असो, बॉलीवूड स्टार अनेक वेळा क्रिकेटच्या मैदानात दिसून येतात. आयपीएलमध्ये शाहरुख खान आणि प्रीती झिंटा यांच्या मालकीच्या दोन टीम आहेत. आता यामध्ये सलमान खान (Salman Khan) याचं नावही जोडलं गेलं आहे. आपल्या कुटुंबाने लंका प्रिमियर लीग (Lanka Premier League)मध्ये कॅन्डी फ्रॅन्चायजी विकत घेतली आहे, या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सलमानच्या टीमचा स्टार खेळाडू क्रिस गेल आहे. टाईम्स ऑफ इंडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार सलमान खानचा भाऊ सोहेल आणि वडिल सलीम खान यांची कंपनी सोहेल खान इंटरनॅशनल या कंपनीने लंका प्रिमियर लीगमध्ये गुंतवणूक केली आहे. सलमानचा छोटा भाऊ सोहेल खान टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाला, 'आम्ही जे खेळाडू विकत घेतले आहेत, आणि चाहत्यांचा जोश ज्या प्रकारचा आहे, तो सगळ्यात वरती आहे. आम्हाला त्यांच्यात मोठी क्षमता दिसत आहे. सलमान खान स्वत: टीमच्या सगळ्या मॅच पाहायला श्रीलंकेला जाणार आहे.' सलमानच्या टीममध्ये क्रिस गेल स्टार खेळाडू आहे, तर लोकल आयकॉन कुसल परेरा आहे. कॅन्डी फ्रॅन्चायजीच्या या टीममध्ये पाकिस्तानचा फास्ट बॉलर वहाब रियाझलाही संधी देण्यात आली आहे. तसंच इंग्लंडचा लियाम प्लंकेट, कुसल मेंडिस, नुआन प्रदीप हे श्रीलंकेचे खेळाडूही सलमानच्या टीममध्ये दिसतील. कॅन्डीच्या टीममध्ये अनुभवी आणि युवा खेळाडूंचं मिश्रण असल्याची प्रतिक्रिया सोहेल खानने दिली.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या