नवी दिल्ली, 29 मार्च : चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाज मोहित शर्माला या हंगामात अजून खेळण्याची संधी मिळालेली नाही. मैदानाबाहेर मात्र त्याने कमाल करण्यात कोणतीही कसर ठेवलेली नाही. चेन्नईच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात मोहित शर्मा विमान प्रवासावेळी खेळाडू आणि इतरांची IQ टेस्ट (बुद्ध्यांक चाचणी) घेताना दिसत आहे.
Travel diaries with the Super Kings - 2.0! Watch them fall prey to the pun of Mohit Sharma! #AnbuDen #WhistlePodu #Yellove @imohitsharma18 pic.twitter.com/LM1f4nohXB
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 28, 2019
मोहित शर्माने पहिल्यांदा महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षीची IQ टेस्ट घेतली. तिला काही सोपे प्रश्न विचारले. मोहितच्या प्रश्नाचे उत्तर तिला देता आलं नाही. त्यानंतर कर्ण शर्मासोबत त्याने चर्चा केली. कर्णलासुद्धा मोहितच्या प्रश्नांवर बोलता आले नाही. रविंद्र जडेजा मात्र मोहितच्या प्रश्नांवर अडकला नाही. जडेजाने मोहितच्या प्रश्नांचे योग्य उत्तर दिले.
चेन्नई त्यांचा पुढचा सामना रविवारी राजस्थानविरुद्ध खेळणार आहे. हा सामना चेन्नईच्या घरच्या मैदानावर होणार आहे. चेन्नईने आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
उत्तर मुंबई : उर्मिलाच्या राजकीय अंदाजासमोर विरोधकही धास्तावले