मुंबई, १४ डिसेंबर २०१८- सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन अनेकदा त्याच्या गोलंदाजीमुळे चर्चेत असतो. पण आता त्याचा बीग बींसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बुधवारी अर्जुन कुटुंबासमवेत ईशा अंबानी आणि आनंद पीरामलच्या लग्नाला गेला होता. इथे त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक फोटोही काढला.
या फोटोमध्ये अर्जुन अमिताभ यांच्या बाजूलाच उभा असून तो त्यांच्यापेक्षा उंचीने मोठा वाटत आहे. बिग बी यांची उंची ६ फूट २ इंच आहे. म्हणजे अर्जुन तेंडुलकरची उंची साधारणपणे ६ फूट ३ इंच असेल. तसं पाहायला गेलं तर सचिन आणि अंजली दोघंही उंचीने जास्त नाहीत तरीही अर्जुन कमालिचा उंच झाला. याचं मूळ कारण त्याची ट्रेनिंग आहे. अर्जुन खूप जास्त धावतो आणि फंक्शनल ट्रेनिंगकडे त्याचं अधिक भर असतो.
अर्जुन हा डावखुरा जलदगती गोलंदाज आहे. भविष्यात त्याची उंची गोलंदाजीसाठी फायदेशीर ठरेल. उंचीमुळे त्याला चांगला बाऊन्स मिळू शकतो आणि वेळेनुसार त्याच्या गोलंदाजीला अधिक धार येईल.
मुंबईत ईशा अंबानी आणि आनंद पीरामलच्या लग्नाला बॉलिवूडप्रमाणे क्रिकेट जगतातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. युवराज सिंग, जहीर खान, हरभजन सिंग आणि अनिल कुंबळे यांनीही उपस्थिती लावली होती.
VIDEO : 102 वर्षांच्या आजीबार्इंनी केलं 14 हजार फुटांवरून स्कायडाइव्हिंग!