सचिनचा दबदबा आजही कायम, 21 व्या शतकातील सर्वश्रेष्ठ टेस्ट बॅट्समन म्हणून निवड

सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) 21 व्या शतकातील सर्वात महान टेस्ट बॅट्समन (Sachin Tendulkar won greatest test batsman of 21st century award) म्हणून निवड झाली आहे.

सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) 21 व्या शतकातील सर्वात महान टेस्ट बॅट्समन (Sachin Tendulkar won greatest test batsman of 21st century award) म्हणून निवड झाली आहे.

  • Share this:
    मुंबई, 20 जून: महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन आठ वर्ष झाली आहेत. सचिननं त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक रेकॉर्ड केले. वन-डे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करण्याचा विक्रम आजही सचिनच्या नावावर आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचं शतक करणारा सचिन हा एकमेव क्रिकेटपटू आहे. सचिनच्या निवृत्तीनंतर अनेक क्रिकेटपटूंनी मैदान गाजवलं. पण सचिनचा दबदबा आजही कायम आहे. सचिन तेंडुलकरची 21 व्या शतकातील सर्वात महान टेस्ट बॅट्समन (Sachin Tendulkar won greatest test batsman of 21st century award) म्हणून निवड झाली आहे. या पुरस्कारासाठी सचिनला श्रीलंकेचा माजी कॅप्टन कुमार संगकारा (Kumar Sangakkara) याने जोरदार लढत दिली. दोघांनाही समान पॉईंट्स मिळाले होते. मात्र या पुरस्कारासाठी निवड करणाऱ्या सदस्यांनी सचिनला जास्त मतं दिली. भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील ऐतिहासिक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे (WTC Final) अधिकृत ब्रॉडकास्टर 'स्टार स्पोर्ट्स' नं शनिवारी या पुरस्काराची घोषणा केली. 'स्टार स्पोर्ट्स'च्या वतीनं बॅट्समन, बॉलर, ऑलराऊंडर आणि कॅप्टन या चार श्रेणीतील पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार आहे. बॅट्समनच्या श्रेणीमध्ये सचिनसह स्टीव्ह स्मिथ, कुमार संगकारा आणि जॅक कॅलीस यांचा समावेश होता. बॉलिंगमध्ये मुथैय्या मुरलीधरन, शेन वॉर्न, डेल स्टेन आणि ग्लेन मॅकग्रा यांचा समावेश आहे. तर ऑल राऊंडरच्या श्रेणीत जॅक कॅलीस, बेन स्टोक्स,  फ्लिंटॉफ आणि आर. अश्विन यांचा समावेश आहे. कॅप्टनच्या गटाच स्टीव्ह वॉ, ग्रॅमी स्मिथ, रिकी पॉन्टिंग आणि विराट कोहली यांना नामांकन आहे. या पुरस्काराच्या निवडीसाठी 50 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये सुनील गावसकर, हरभजन सिंग, शेन वॉटसन, स्कॉट स्टायरिस, गौतम गंभीर या खेळाडूंसह जगभरातील ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, विश्लेषक आणि अँकर्सचा समावेश आहे. WTC Final : तिसऱ्या दिवशी क्रिकेटची रंगत की पावसाचा अडथळा? वाचा रविवारचे हवामान सचिन तेंडुलकरनं 16 व्या वर्षी 1989 साली पाकिस्तान विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 17 व्या वर्षीच इंग्लंड विरुद्धच्या टेस्टमध्ये पहिले शतक झळकावले होते. 'विस्डेन'नं 2002 साली सचिनची डॉन ब्रॅडमननंतरचा सर्वोत्तम टेस्ट बॅट्समन आणि व्हिव रिचर्ड्स नंतरचा सर्वोत्तम वन-डे बॅट्समन म्हणून निवड केली होती.
    Published by:News18 Desk
    First published: