Home /News /sport /

'मास्टर ब्लास्टर' विराट कोहलीवर आजही भारी, निवृत्तीनंतर 8 वर्षांनीही लोकप्रियतेत आघाडी

'मास्टर ब्लास्टर' विराट कोहलीवर आजही भारी, निवृत्तीनंतर 8 वर्षांनीही लोकप्रियतेत आघाडी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) निवृत्त होऊन आता 8 वर्षांचा कालावधी उलटला आहे. या मोठ्या कालावधीनंतरही सचिनची लोकप्रियता विराट कोहलीपेक्षा (Virat Kohli) जास्त आहे.

    मुंबई, 16 डिसेंबर : मास्टर ब्लास्ट सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) निवृत्त होऊन आता 8 वर्षांचा कालावधी उलटला आहे. या मोठ्या कालावधीनंतरही सचिनची लोकप्रियता कायम आहे. एका नुकत्याच  प्रकाशित झालेल्या यादीत या वर्षातील 'मोस्ट एडमायर्ड' व्यक्तींच्या यादीत सचिननं टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) मागे टाकले आहे. YouGov या वेबसाईटने 2021 मधील 'मोस्ट एडमायर्ड' व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. जगभरातील टॉप 20 व्यक्तींची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये क्रीडा विश्वातील 4 जणांना स्थान देण्यात आले आहे. या यादीमध्ये सचिन तेंडुलकरने एकूण 12 वा तर स्पोर्ट्सच्या यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. तर विराट कोहलीनं एकूण 18 वा तर स्पोर्ट्सच्या यादीत चौथा क्रमांक पटकावला आहे. विराट कोहली हा सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केला जाणारा  भारतीय खेळाडू आहे. तरीही एकूण लोकप्रियतेच्या बाबतीत 2013 साली निवृत्त झालेला सचिन आजही सरस असल्याचं या यादीतून स्पष्ट झालं आहे. क्रिकेटमधील सर्वाधिक शतकं आणि रन करण्याचा रेकॉर्ड सचिनच्या नावावर आहे. त्याचबरोबर 'भारतरत्न' या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित झालेला सचिन हा एकमेव क्रिकेटपटू आहे. तर दुसरिकडं विराट कोहली यंदा वन-डे टीमची कॅप्टनसी सोडण्याच्या प्रकरणात वादग्रस्त ठरला होता. PAK vs WI: वेस्ट इंडिजच्या टीममध्ये Corona Blast, पाकिस्तान विरुद्धची मालिका धोक्यात कोणता खेळाडू सरस? मँचेस्टर युनायटेड आणि पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) एकूण यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर असून खेळाडूंच्या यादीत तो अव्वल आहे. रोनाल्डोने नुकताच 800 गोल करण्याचा विक्रम केला आहे. त्याने अर्जेंटीनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला (Lionel Messi) मागे टाकलंय. मेस्सीनं एकूण 7 वा तर खेळाडूंच्या यादीत दुसरा क्रमांक पटकावला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Sachin tendulkar, Virat kohli

    पुढील बातम्या