सचिनने केली 14 कोटींची मागणी; हे आहे कारण... Sachin Tendulkar | Cricket Bat

सचिनने केली 14 कोटींची मागणी; हे आहे कारण... Sachin Tendulkar | Cricket Bat

भारताचा महान माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एका ऑस्ट्रेलियाच्या बॅट निर्मिती कंपनीवर खटला दाखल केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 जून: भारताचा महान माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एका ऑस्ट्रेलियाच्या बॅट निर्मिती कंपनीवर खटला दाखल केला आहे. या कंपनीने त्यांचे उत्पादनाची विक्री वाढवण्यासाठी सचिनच्या नावाचा आणि फोटोचा वापर केल्याने हा खटला दाखल करण्यात आला आहे. नावाचा आणि फोटोचा वापर केल्याने कंपनीने सचिनला रॉयल्टी म्हणून 14 कोटी देण्याचे अपेक्षित होते. पण संबंधित कंपनीने ही रक्कम अद्याप दिली नसल्याने सचिनने खटला दाखल केला आहे. क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या सचिनच्या नावाचा गैरवापर करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे मानले जात आहे. सचिनने देखील रॉयल्टीसाठी इतकी मोठी रक्कम मागितल्याने सर्वांचे लक्ष या खटल्याकडे वेधले गेले आहे.

'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि स्पार्टन या क्रिडा उत्पादने तयार करणाऱ्या कंपनीमध्ये 2016साली एक करार झाला होता. या करारानुसार प्रत्येक वर्षी कंपनीच्या उत्पादनावर सचिनचा फोटो आणि लोगो वापरण्यासाठी कंपनी सचिनला 10 लाख डॉलर देणार होती. या करारानुसार ही कंपनी 'सचिन बाय स्पार्टन' हा टॅगलाईन देखील वापर करू शकणार होती. पण त्यानंतर कंपनीकडून कराराचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे सचिनने हा खटला दाखल केला आहे.

बिग बींचा टोला; वर्ल्ड कप, पाऊस आणि ICCवर अशी घेतली फिरकी

यासंदर्भात 'रॉयटर्स'ने स्पार्टन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्याकडे यासंदर्भात बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. तर सचिनकडून या प्रकरणाची बाजू मांडणाऱ्या 'गिल्बर्ड अॅण्ड टोबिन' या कायदा कंपनीने यासंदर्भात काहीही बोलण्यास नकार दिला आहे. या खटल्याची सुनावणी करणाऱ्या कोर्टाने आपल्या वेबसाईटवर 5 जून रोजी याचिका दाखल केल्याचे म्हटले आहे. संबंधित खटल्याची सुनावणी 26जून रोजी सिडनी येथील कोर्टात होणार आहे. पहिल्या सुनावणीत दोन्ही पक्षकारांना बाजू मांडण्याची संधी दिली जाईल.

ऑस्ट्रेलियाने सचिनला 2012मध्ये देशातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार असलेल्या 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया'चे मानद सदस्य बनवले होते. सध्या इंग्लंडमध्ये क्रिकेट वर्ल्डकप सुरु आहे. सचिनने या वर्ल्डकपमध्ये समालोचक म्हणून पदार्पण केले आहे.


VIDEO: नाशिकमध्ये भरदिवसा गोळीबार करून सशस्त्र दरोडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 14, 2019 04:23 PM IST

ताज्या बातम्या