World Cup : सचिनची भविष्यवाणी ठरली खरी, टीम इंडियाबाबत सांगितलं होतं...

सचिन क्रिकेटच्या मैदानावर दिसत नसला तरी मैदानावर काय होणार याबद्दलचा त्याचा शब्द आजही प्रमाण मानला जातो.

News18 Lokmat | Updated On: Jul 4, 2019 01:48 PM IST

World Cup : सचिनची भविष्यवाणी ठरली खरी, टीम इंडियाबाबत सांगितलं होतं...

नवी दिल्ली, 04 जुलै: भारताचा मास्टर ब्लास्टर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन 6 वर्ष झाली आहेत. सचिन क्रिकेटच्या मैदानावर दिसत नसला तरी मैदानावर काय होणार याबद्दलचा त्याचा शब्द आजही प्रमाण मानला जातो. जेव्हा क्रिकेटचा विषय निघतो तेव्हा सचिनचे मत किंवा त्याने दिलेला सल्ला टाळता येत नाही. हीच बाब आता सचिनने केलेल्या एका भविष्यवाणीबद्दल देखील खरी ठरली आहे. सचिनने आयसीसी वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये कोणते चार संघ असतील याबद्दल भविष्यवाणी केली होती आणि आता ती तंतोतंत खरी ठरली आहे.

इंग्लंडमधील वर्ल्ड कप स्पर्धेत सचिनने समालोचक म्हणून पदार्पण केले होते. त्यामुळे मैदानावरील घटनांवरील त्याचे भाष्य अधिक प्रमाणात ऐकण्याची संधी क्रिकेटप्रेमींना मिळाली. याच दरम्यान सचिनने वर्ल्ड कपसंदर्भात जे जे अंदाज व्यक्त केले होते ते ते खरे ठरले आहेत. सचिनने कोणते संघ सेमीफायनलमध्ये असतील आणि कोणते असणार नाहीत याबद्दल भविष्यवाणी केली होती. ESPN क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत सचिनने 4 संघांचा उल्लेख केला होता. सेमीफायनलमध्ये पहिल्या 3 संघांमध्ये भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ असतील असा अंदाज सचिनने व्यक्त केला होता. तर चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात स्पर्धा असेल असे सांगितले होते. आता सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या पाकिस्तानच्या आशा जवळ जवळ संपुष्ठात आल्या आहेत आणि चौथा संघ न्यूझीलंडच असेल. त्यामुळे सचिनची भविष्यवाणी खरी ठरत आहे.

World Cup: सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी पाकिस्तानला करावा लागेल हा चमत्कार!

भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे चारही संघ संतुलित आहेत. सर्व खेळाडू फॉर्ममध्ये आहेत आणि जबाबदारी घेतात, असे सचिनने त्या मुलाखतीत सांगितले होते. वर्ल्ड कपमधील सेमीफायनलची पहिली लढत 9 जुलै रोजी होणार आहे. तर दुसरी लढत 11 जुलै रोजी होणार आहे. अंतिम लढत 14 जुलै रोजी लॉर्ड्स होणार आहे.

World Cup: रवींद्र जडेजाची सटकली, भारताच्याच माजी क्रिकेटपटूला सुनावले!

Loading...

VIDEO: निकृष्ट चौपदरीकरणाविरोधात नितेश राणे आक्रमक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2019 01:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...