Home /News /sport /

सचिन म्हणतो, ही होती आयुष्यातली सर्वोत्तम सीरिज

सचिन म्हणतो, ही होती आयुष्यातली सर्वोत्तम सीरिज

भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने त्याच्या कारकिर्दीतली सर्वोत्तम सीरिज सांगितली आहे.

    मुंबई, 17 नोव्हेंबर : भारतीय क्रिकेट टीमच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला 27 नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन वनडे, तीन टी-20 आणि चार टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. वनडे सीरिजपासून या दौऱ्याला सुरुवात होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या सीरिज नेहमीच अटीतटीच्या होतात. क्रिकेटमधल्या या दोन्ही दिग्गज टीम मैदानात एकमेकांविरुद्ध कायमच संघर्ष करताना दिसतात. भारताला सुरुवातीला घरात वाघ टीम अशी उपमा दिली जायची, कारण परदेशात टीमची कामगिरी चांगली व्हायची नाही, पण सौरव गांगुली (Sourav Ganguly) कर्णधार होताच टीमचा चेहरामोहरा बदलला. भारत आता घरात तर वाघ आहेच, पण परदेशी खेळपट्ट्यांवरही टीमची कामगिरी सुधारली आहे. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने त्याच्या कारकिर्दीतली सर्वोत्तम सीरिज सांगितली आहे. 2001 साली ऑस्ट्रेलिया टीमचा भारत दौरा लोकप्रिय झाला. या दौऱ्यातली पहिली टेस्ट मॅच भारताने वाईट पद्धतीने गमावली होती. तर दुसरी टेस्टही भारतीय टीम हरल्यातच जमा होती. पण व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांनी ऐतिहासिक कामगिरी करत सगळं काही बदलून टाकलं, आणि भारताने ही सीरिज 2-1 ने जिंकली. एबीसीसी ऑस्ट्रेलियाशी बोलताना सचिन म्हणाला, 'स्टीव्ह वॉनेही हा भारताचा शेवटचा दौरा असल्याचं सांगितलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी ही सीरिज महत्त्वाची झाली होती. पहिल्या टेस्टमध्ये त्यांनी आमचा 10 विकेटने सहज पराभव केला, पण दुसऱ्या टेस्टपासून आम्ही चांगली कामगिरी केली. भारताने सीरिज 2-1 ने जिंकली. ही सीरिज माझ्या आयुष्यातली सर्वोत्तम सीरिज होती.' क्रिकेटमधला सगळ्यात महान खेळाडू असलेल्या सचिनच्या नावावर अनेक विश्वविक्रम आहेत. 2011 सालच्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचा सचिन भाग होता, पण त्याच्यासाठी 2001 सालची सीरिजच सर्वोत्तम आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या