सचिनच भारी; या World Cupमध्येही मोडता आला नाही मास्टर ब्लास्टरचा विश्वविक्रम!

सचिन तेंडुलकरचा विक्रम कोणाला मोडायचा असेल तर त्यांना पुढच्या म्हणजेच 2023मध्ये भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपची वाट पहावी लागणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 15, 2019 07:33 AM IST

सचिनच भारी; या World Cupमध्येही मोडता आला नाही मास्टर ब्लास्टरचा विश्वविक्रम!

लंडन, 15 जुलै: ICC cricket world cupच्या फायनलमध्ये सनसनाटी विजय मिळवत विजेतेपद मिळवले. या वर्ल्ड कपमध्ये अनेक नवे विक्रम झाले. जुन्या विक्रमांना मागे टाकत अनेकांनी ऐतिहासिक कामगिरी केली. असा एक विक्रम जो वर्ल्ड कपच्या इतिहासात सचिन तेंडुलकरने केला आहे तो मात्र या कोणालाही मोडता आला नाही. त्यामुळे आता सचिनचा विक्रम कोणाला मोडायचा असेल तर त्यांना पुढच्या म्हणजेच 2023मध्ये भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपची वाट पहावी लागणार आहे.

वर्ल्ड कपमध्ये यावेळी 7 फलंदाजांनी 500हून अधिक धावा केल्या. पण या 7 ही फलंदाजांना सचिनचा विक्रम मोडता आला नाही. एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करण्य़ाचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. सचिनने 2003च्या वर्ल्ड कपमध्ये 673 धावा केल्या होत्या. यावेळी भारताचा रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर यांच्याकडे सचिनचा विक्रम मोडण्याची संधी होती. हे दोन्ही फलंदाज सचिनच्या विक्रमाच्या जवळ पोहोचले देखील होते. पम त्यांना तो मोडता आला नाही. रोहित शर्माने स्पर्धेत सर्वाधिक 648 धावा केल्या. तर वॉर्नरने 647 धावा केल्या.

अंतिम सामन्यात पोहोचलेल्या न्यूझीलंडच्या केन व्हिल्यमसन आणि इंग्लंडच्या जो रुटला देखील सचिनचा विक्रम मोडण्याची संधी होती. पण या दोघांना फायनलमध्ये सचिनचा विक्रम मोडणारी मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळेच सचिनचा 16 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला गेला नाही. सचिनचा विक्रम मोडण्यासाठी व्हिल्यमसनला 126 तर रुटला 125 धावांची गरज होती. पण त्यांनी अनुक्रमे 30 आणि 7 धावाच केल्या.

स्पर्धेत व्हिल्यमसनने 10 सामन्यात 578 तर रुटने 11 सामन्यात 556 धावा केल्या. अर्थात व्हिल्यमसनने कर्णधार म्हणून एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. त्याने श्रीलंकेच्या महेला जयवर्धने याचा विक्रम मागे टाकला. जयवर्धनेने 2007च्या वर्ल्ड कपमध्ये कर्णधार असताना 548 धावा केल्या होत्या.

सचिनने 2003च्या वर्ल्ड कपमध्ये 11 सामन्यात 61.18च्या सरासरीने 673 धावा केल्या होत्या. तर या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडन याने 657 धावा केल्या होत्या.

Loading...

SPECIAL REPORT: सत्ता गेली, समृद्धीही गेली; काँग्रेस पक्षाला कडकी लागली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 15, 2019 07:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...