मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

रोहित-द्रविड जोडीकडून सचिनला सर्वात मोठी आशा, म्हणाला...

रोहित-द्रविड जोडीकडून सचिनला सर्वात मोठी आशा, म्हणाला...

टीम इंडियाचा लिमिटेड ओव्हर्सच्या प्रकारातील कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) या जोडीकडून सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) सर्वाच मोठी आशा व्यक्त केली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 28 जानेवारी : टीम इंडियाला 2013 नंतर एकाही आयसीसी स्पर्धेचं विजेतेपद मिळवता आलेलं नाही. आता यावर्षी ऑस्ट्रेलियात टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2022) होणार असून पुढील वर्षी भारतामध्ये वन-डे वर्ल्ड कप (ICC ODI World Cup 2023) होणार आहे. या दोन्ही वर्ल्ड कपची तयारी म्हणून टीम इंडियात अनेक बदल झाले आहेत. रोहित शर्माची (Rohit Sharma) कॅप्टन म्हणून तर राहुल द्रविडची (Rahul Dravid) हेड कोच म्हणून झालेली नियुक्ती याच तयारीचा भाग आहे.

रोहित-द्रविड जोडी वर्ल्ड कप जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करेल अशी आशा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) व्यक्त केली आहे. बोरिया मजूमदार यांच्या रेवस्पोर्ट्स या चॅनेलवर बोलताना सचिननं ही आशा व्यक्त केली . 'एप्रिल महिन्यात टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकून 11 वर्ष होतील. आपण कोणताही वर्ल्ड कप जिंकलेला नाही. ही मोठी प्रतीक्षा आहे. माझ्यासह प्रत्येक व्यक्तीची भारतीय टीमनं वर्ल्ड कप जिंकावा अशी इच्छा आहे.' असे सचिनने यावेळी स्पष्ट केले.

सचिन पुढे म्हणाला की, 'प्रत्येक खेळाडू वर्ल्ड कप जिंकण्यासाठी खेळत असतो. वर्ल्ड कप लहान फॉर्मेटमधील असो वा मोठ्या मोठ्या फॉर्मेटमधील तो खास असतो. त्यापेक्षा मोठे क्रिकेटपटूसाठी काहीही नसते. रोहित आणि राहुल ही एक जबरदस्त जोडी आहे. ते दोघंही सर्वोत्तम योगदान देतील. ते या स्पर्धेची पूर्ण तयारी करतील हे मला माहिती आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी इतकी सारी मंडळी आहेत. योग्य वेळी सोबत असण्याचा हाच तर फायदा आहे.

टेस्ट टीमच्या कॅप्टनसीची शर्यत वाढली, आणखी एक दिग्गज जबाबदारीसाठी सज्ज

राहुलनं खूप क्रिकेट खेळलं आहे. या मार्गात चढ-उतार येणार हे त्याला माहिती आहे. पण, हार स्वीकारून चालणार नाही. सतत प्रयत्न करत पुढे गेलं पाहिजे.' मागच्या वर्षी विराट कोहलीनंतर रोहित शर्माकडे लिमिटेड ओव्हर्सच्या टीमची कॅप्टनसी देण्यात आली आहे. तर रवी शास्त्री यांचा हेड कोच म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर त्याच्या जागी राहुल द्रविडची नियुक्ती करण्यात आली आहे.

First published:

Tags: Cricket news, Rahul dravid, Rohit sharma, Sachin tendulkar