सचिनचा गाडी थांबवून रिक्षाचालकाशी मराठीमध्ये संवाद, पाहा VIDEO

सचिनचा गाडी थांबवून रिक्षाचालकाशी मराठीमध्ये संवाद, पाहा VIDEO

मुंबईमध्ये अनेक ठिकाणी कामं सुरू असल्यामुळे अनेक रस्ते वनवे करण्यात आले आहेत. याचा फटका महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यालाही बसला.

  • Share this:

मुंबई, 25 नोव्हेंबर : मुंबईमध्ये अनेक ठिकाणी कामं सुरू असल्यामुळे अनेक रस्ते वनवे करण्यात आले आहेत. याचा फटका महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यालाही बसला. संपूर्ण आयुष्य मुंबईत घालवलेल्या सचिन तेंडुलकरला वनवेमुळे घरी जायचा रस्ताच सापडत नव्हता, अखेर मुंबईतल्या रिक्षाचालकाची मदत घेऊन सचिन योग्य रस्त्यावर पोहोचला. या सगळ्या घटनेचा व्हिडिओ सचिनने त्याच्या फेसबूक पेजवर शेयर केला आहे. या रिक्षाचालकाशी सचिन मराठीमध्ये बोलला, तसंच त्याची विचारपूसही केली.

'मी कांदिवली पश्चिममध्ये आहे, मोठ्या प्रमाणावर काम सुरू असल्यामुळे मी रस्ता चुकलो आहे, त्यामुळे मी पुढच्या रिक्षाच्या मागे जात आहे. त्या रिक्षाचालकाने मला फॉलो करा, असं सांगितलं, त्यामुळे मी त्याच्या मागोमाग जात आहे. हा रिक्षाचालक मला हायवेपर्यंत सोडणार आहे,' असं सचिन या व्हिडिओमध्ये म्हणाला.

मंगेश फडतरे, असं या रिक्षाचालकाचं नाव होतं. मी आणि माझी मुलगी तुमचे फॅन असल्याचं मंगेश यांनी सचिनला सांगितलं. यानंतर मंगेश यांनी सचिनसोबत एक सेल्फीही काढला. सेल्फी काढल्यानंतर मागून येणारी गाडी बघा, सांभाळा, असंही सचिनने मंगेश यांना सांगितलं. योग्य रस्त्यावर पोहोचल्यानंतर सचिनने मंगेश यांचे आभार मानले. यानंतर सचिन योग्य रस्त्याला लागला आणि घरी जायला निघाला, तसंच मला एकट्याला हा रस्ता कधीच सापडला नसता, अशी कबुलीही सचिनने दिली.

जानेवारी 2020 सालचा सचिनचा हा व्हिडिओ आहे. मागच्या अनेक महिन्यात तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण रस्ते शोधत प्रवास करतो, पण माणसाच्या मदतीला पर्याय नाही. जानेवारी महिन्यात रस्ता चुकल्यानंतर मंगेश यांनी मला मदत केली, असं सचिन तेंडुलकर या पोस्टमध्ये म्हणाला आहे.

Published by: Shreyas
First published: November 25, 2020, 4:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या