S M L

"सलामत रहे दोस्ताना...",सचिनने दिली विरूला 1.36 कोटींची बीएमडब्ल्यू कार भेट

सचिनने गिफ्ट केलेली कार ही बीएमडब्ल्यू 730 एलडी कार आहे. या कारची किंमत 1.36 कोटी आहे. या कारचा वेग 250 किमी प्रतितास इतका आहे.

Sachin Salve | Updated On: Sep 27, 2017 09:14 PM IST

 

27 सप्टेंबर : क्रिकेटच्या मैदानावर वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर या जोडीने जी काय धम्माल केली होती हे सर्वांनाच माहीत आहे. ही जोडी ज्या ज्या वेळी ओपनिंगला उतरली तेव्हा बाॅलरची खैर नव्हती.

वीरेंद्र सेहवाग आणि सचिनची जोडी मैदानावरच नाहीतर मैदानाबाहेर पण चांगले मित्र आहे. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही दोघांची मैत्री अतूट आहे. आज सचिनने आपल्या या लाडक्या विरूला 1 कोटी 36 लाख किंमतीची बीएमडब्ल्यू कार भेट दिली आहे.

वीरेंद्र सेहवागने आपल्या टिवटर अकाऊंटवर सचिनने दिलेल्या कारसोबत फोटो शेअर केलाय. आणि सचिनने आभार मानले आहे.

सचिनने गिफ्ट केलेली कार ही बीएमडब्ल्यू 730 एलडी कार आहे. या कारची किंमत 1.36 कोटी आहे. या कारचा वेग 250 किमी प्रतितास इतका आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 27, 2017 09:14 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close