मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /सचिनची मॅच फक्त 50 रुपयांत पाहण्याची फॅन्सना संधी! 23 तारखेपासून सुरु होणार तिकिटांची विक्री

सचिनची मॅच फक्त 50 रुपयांत पाहण्याची फॅन्सना संधी! 23 तारखेपासून सुरु होणार तिकिटांची विक्री

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये 2 मार्चपासून वर्ल्ड सेफ्टी रोड सीरिज (Road Safety World Series)  स्पर्धा सुरु होत आहे. या स्पर्धेत सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा (Brian Lara) यांच्यासह अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत.

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये 2 मार्चपासून वर्ल्ड सेफ्टी रोड सीरिज (Road Safety World Series) स्पर्धा सुरु होत आहे. या स्पर्धेत सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा (Brian Lara) यांच्यासह अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत.

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये 2 मार्चपासून वर्ल्ड सेफ्टी रोड सीरिज (Road Safety World Series) स्पर्धा सुरु होत आहे. या स्पर्धेत सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा (Brian Lara) यांच्यासह अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत.

मुंबई, 19 फेब्रुवारी : महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) मैदानात खेळताना पाहण्याचा अनुभव हा नेहमीच अविस्मरणीय असतो. सचिननं आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. तरीही तो क्रिकेटपासून दूर गेलेला नाही. सचिन आजही क्रिकेट खेळतो.  छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये 2 मार्चपासून वर्ल्ड सेफ्टी रोड सीरिज (Road Safety World Series)  स्पर्धा सुरु होत आहे. या स्पर्धेत सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा (Brian Lara) यांच्यासह अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत.

या सीरिजमध्ये भारतासह वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश आणि इंग्लंड या सहा देशांमधील खेळाडू खेळणार आहेत. दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये रंगणाऱ्या या खेळाडूंच्या मॅचची तिकीट विक्री 23 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या तिकिटांची किमान किंमत 50 रुपये तर कमाल किंमत 500 रुपये आहे. याचाच अर्थ क्रिकेट फॅन्सना फक्त 50 रुपयांमध्ये सचिनचा खेळ प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहण्याची सुवर्णसंधी आहे.

या सीरिजमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व टीम 25 फेब्रुवारीपर्यंत दाखल होतील. एक आठवडा बायो बबलमध्ये राहिल्यानंतर त्यांना क्रिकेट खेळता येईल. या स्पर्धेत एकूण 15 मॅच होणार असून 21 मार्च रोजी फायनल होणार आहे.

( वाचा : VIDEO: मी तर लहानपणापासून... मुंबई इंडियन्सनं निवडताच अर्जुनची भावुक प्रतिक्रिया )

कोरोनाचा बसला होता फटका!

या सीरिजची सुरुवात मागच्या वर्षी झाली. पहिल्याच वर्षी ही स्पर्धा चांगलीच लोकप्रिय झाली. मात्र मागच्या वर्षी फक्त चार मॅचनंतर ही सीरिज कोरोनामुळे स्थगित करावी लागली होती. आता सीरिजमधील उर्वरित मॅच रायपूरमध्ये होणार आहेत.

या स्पर्धेच्या निमित्तानं सचिन, लारासह वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंह, झहीर खान, मुरलीधरन, चामिंडा वास, तिलकरत्ने दिलशान जॉन्टी ऱ्होडस, लान्स क्लुसनर यासारख्या दिग्गज खेळाडूंचा खेळ क्रिकेट फॅन्सना पुन्हा एकदा पाहता येणार आहे. 65 हजार क्षमतेच्या क्रिकेट मैदानात या लढती होणार आहेत. कोरोना निर्बंधामुळे फक्त 25 हजार प्रेक्षकांनाच मैदानात उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. या स्पर्धेच्या सर्व तिकिटांची विक्री होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

रायपूरचं हे स्टेडियम दिल्ली कॅपिटल्सचं होम ग्राऊंड होतं. हे स्टेडियम मोठं असल्यानं सिक्स आणि फोरची बरसात करण्यासाठी दिग्गज खेळाडूंना जोर लावावा लागणार आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket, Sachin tendulakar