मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचा तडाखा, दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचा तडाखा, दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय

या मॅचमध्ये वेस्ट इंडिजला (West Indies) शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 19 रनची तर शेवटच्या दोन बॉलमध्ये 8 रनची गरज होती. त्यांचा प्रयत्न फक्त 1 रननं कमी पडला.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 30 जून : दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज (SA vs WI) यांच्यामध्ये मंगळवारी रात्री झालेली तिसरी टी20 मॅच शेवटच्या बॉलपर्यंत रंगली. या मॅचमध्ये वेस्ट इंडिजला शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 19  तर शेवटच्या दोन बॉलमध्ये 8 रनची गरज होती. त्यांचा प्रयत्न फक्त 1 रननं कमी पडला. या विजयासह 5 मॅचच्या या सीरिजमध्ये दक्षिण आफ्रिकेनं 2-1 अशी आघाडी घेतली आहे. पहिली मॅच 15 ओव्हर्समध्ये गमावल्यानंतर पुढील दोन मॅच जिंकत आफ्रिकेनं ही आघाडी घेतली आहे.

50 व्या मॅचमध्ये अर्धशतक

वेस्ट इंडिजचा कॅप्टन कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याने टॉस जिंकत सलग तिसऱ्यांदा दक्षिण आफ्रिकेला बॅटींग करण्याचं निमंत्रण दिले. मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा विकेट किपर- बॅट्समन क्विंटन डी कॉक (Quintion de Kock) याची ही 50 वी आंतरराष्ट्रीय टी20 मॅच होती. त्याने आक्रमक अर्धशतक झळकावत 51 बॉलमध्ये 5 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं 72 रन काढले.

डी कॉक वेस्ट इंडिज विरुद्धच्या सीरिजमध्ये चांगल्यात फॉर्मात आहे. त्याने यापूर्वी टेस्ट सीरिजमध्ये नाबाद 141 आणि 96 रन काढले होते. त्याचा फॉर्म आगामी आयपीएल स्पर्धेसाठी (IPL 2021) मुंबई इंडियन्सला दिलासा देणारा आहे. डी कॉकच्या फटकेबाजीमुळे आफ्रिकेनं वर्ल्ड चॅम्पियन टीमसमोर 168 रनचं आव्हान ठेवलं.

शम्सीचा स्पेल निर्णायक

वेस्ट इंडिजच्या एकाही बॅट्समनला मोठा स्कोअर करता आला नाही. लुईस, सिमन्स, निकोसल पूरन, आंद्रे रसेल हे सर्व 20 रनचा टप्पा ओलांडल्यानंतर लगेत आऊट झाले. दक्षिण आफ्रिकेकडून तरबेझ शम्सीने (Tabraiz Shamsi) 4 ओव्हर्समध्ये फक्त 13 रन देत लुईस आणि हेटमायरला आऊट केले.

इंग्लंडमध्ये विराट-धोनी फेल, एकच 'ध्रुव', जिंकायचं असेल तर त्याच्याकडून शिका!

वेस्ट इंडिजला शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 19 रन हवे होते. कागिसो रबाडानं टाकलेल्या त्या ओव्हरमध्ये फॅबियन एलननं चांगली फटकेबाजी केली. त्याचे प्रयतन एक रननं कमी पडले. 13 रन देऊन 2 विकेट्स घेणाऱ्या शाम्सीला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

First published:

Tags: Cricket, IPL 2021, Mumbai Indians, South africa