SA vs PAK: पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमचं शतक, विराट कोहलीचा मोडला रेकॉर्ड

SA vs PAK: पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमचं शतक, विराट कोहलीचा मोडला रेकॉर्ड

पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) याने आणखी एक रेकॉर्ड केला आहे. वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात कमी इनिंगमध्ये 13 शतक झळकवण्याचा रेकॉर्ड बाबरनं केला आहे.

  • Share this:

मुंबई, 3 एप्रिल : पाकिस्तान विरुदध दक्षिण आफ्रिका (Pakistan vs south Africa)  यांच्यातील पहिली वन-डे मॅच शुक्रवारी झाली. या मॅचमध्ये पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) याने आणखी एक रेकॉर्ड केला आहे. वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात कमी इनिंगमध्ये 13 शतक झळकवण्याचा रेकॉर्ड बाबरनं केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावताच बाबरनं हा रेकॉर्ड केला. त्याने या शर्यतीमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला (Virat Kohli) मागे टाकलं आहे.

यजमान दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदा बॅटींग करताना 6 आऊट 273 रन केले होते. रेसी व्हॅन डर हुसेननं नाबाद 123 रन केले. त्यानं 134 बॉलमध्ये 10 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं हे रन केले.  त्याचबरोबर डेव्हिड मिलरनं 50 रन काढले. पाकिस्तानकडून शाहिन आफ्रिदी आणि हॅरीस राऊफ यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर मोहम्मद हसनैन आणि फहीम अश्रफ यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

पाकिस्तानच्या इनिंगची सुरुवात चांगली झाली नाही. कागिसो रबाडानं फकर झमानला झटपट आऊट केलं. त्यानंतर बाबर आझम (103) आणि इमाम उल हक (70) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 177 रनची पार्टनरशिप केली. बाबरनं त्याचं शतक 104 बॉलमध्ये 17 फोरच्या मदतीनं पूर्ण केलं. तर इमान उल हकनं 80 बॉलमध्ये 70 रन केले.  पाकिस्ताननं  ही अगदी शेवटच्या बॉलवर 3 विकेट्सनं जिंकली.

( वाचा : धोनीच्या चाहत्यांनी शोधलं त्याचं 7 वर्षांपूर्वीचं ट्वीट; पुन्हा सुरू झाली चर्चा )

बाबर आझमनं 76 व्या वन-डे मॅचमध्ये 13 वं शतक झळकावलं आहे. यापूर्वी कोणत्याही खेळाडूला 80 पेक्षा कमी इनिंगमध्ये ही कामगिरी करता आली नव्हती. दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमलानं 83 मॅचमध्ये ही कामगिरी केली होती. तर विराट कोहली आणि क्विंटन डी कॉक यांनी 86 मॅचमध्ये हा रेकॉर्ड केला होता. वन-डे रँकींगमध्ये सध्या विराट कोहली पहिल्या तर बाबर आझम दुसऱ्या क्रमांकावर आहे. या शतकानंतर बाबर आझमला फायदा होणार आहे.

Published by: News18 Desk
First published: April 3, 2021, 10:18 AM IST

ताज्या बातम्या