मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या श्रीसंतला 'टीम इंडिया'कडून खेळायची आहे ही स्पर्धा

क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या श्रीसंतला 'टीम इंडिया'कडून खेळायची आहे ही स्पर्धा

सात वर्षानंतर भारताचा फास्ट बॉलर एस श्रीसंत (S Sreesanth) प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy 2021) साठी केरळ (Kerala)च्या टीमच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत श्रीसंतची निवड करण्यात आली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 27 डिसेंबर : सात वर्षानंतर भारताचा फास्ट बॉलर एस श्रीसंत (S Sreesanth) प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy 2021) साठी केरळ (Kerala)च्या टीमच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत श्रीसंतची निवड करण्यात आली आहे. या टी-20 स्पर्धेसाठीच्या कॅम्पमध्ये श्रीसंत संजू सॅमसनसोबत सहभागी होईल. क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करण्याची श्रीसंत आतुरतेने वाट बघत होता. आता 2023 वर्ल्ड कप खेळणं हे आपलं अंतिम लक्ष्य असल्याचं श्रीसंत म्हणाला आहे. श्रीसंतने ऑगस्ट 2011 साली भारतासाठी आणि 2013 साली शेवटची प्रथम श्रेणी मॅच खेळली होती. 37 वर्षांचा श्रीसंत अडचणी आणि अनेक आरोपांनंतर क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. लिएंडर पेस, रॉजर फेडरर आणि सचिन तेंडुलकर आपलं प्रेरणास्थान आहे, असं श्रीसंत म्हणाला. त्याने टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. 'या वयात खेळ जगतात तुमच्यामध्ये काही खास शिल्लक नसतं, ही खरी गोष्ट आहे, पण पेसने वयाच्या 42 व्या वर्षी ग्रॅण्ड स्लॅम जिंकला, हीच गोष्ट रॉजर फेडररचीही आहे,', अशी प्रतिक्रिया श्रीसंतने दिली. 'बॉलिंगचा प्रश्न आहे, तर मी इतिहास घडवीन. माझं लक्ष्य पुढचा मोसम नाही, तर 2023 वर्ल्ड कप आहे. सध्या मी फिटनेस आणि बॉलिंगवर काम करत आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीनंतर मला रणजी ट्रॉफी आणि इराणी ट्रॉफीमध्येही खेळायचं आहे,' अशी इच्छा श्रीसंतने बोलून दाखवली. 'आमची पहिली मॅच वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. मी शेवटची मॅचही याच मैदानावर खेळलो होतो. काळाचं चक्र पूर्णपणे फिरलं आहे. केरळने ही स्पर्धा जिंकलेली नसली, तरी आमच्याकडची टीम चांगली आहे,' असं वक्तव्य श्रीसंतने केलं.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या