Home /News /sport /

मैदानावर परतला जुना श्रीशांत, सराव सामन्यात केलं स्लेजिंग; पाहा VIDEO

मैदानावर परतला जुना श्रीशांत, सराव सामन्यात केलं स्लेजिंग; पाहा VIDEO

जवळपास आठ वर्षांनंतर एस. श्रीशांत (S. Sreesanth) स्पर्धातमक क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी सज्ज आहे. श्रीशांत नुकत्याच दोन वॉर्म अप मॅच खेळला. यापैकी एका सामन्यात जुन्या श्रीशांतचं आक्रमक रुप पाहयला मिळालं.

    मुंबई, 1 जानेवारी : जवळपास आठ वर्षांनंतर एस. श्रीशांत (S Sreesanth) स्पर्धातमक क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी सज्ज आहे. श्रीशांची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी (Syed Mushtaq Ali Trophy) केरळ (Kerala ) टीममध्ये निवड झाली आहे. केरळची टीम या स्पर्धेची सध्या तयारी करत आहे. या तयारीचा भाग म्हणून श्रीशांत नुकत्याच दोन वॉर्म अप मॅच खेळला. यापैकी एका  सामन्यात जुन्या श्रीशांतचं आक्रमक रुप पाहयला मिळालं. श्रीशांत त्याच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध होता. प्रतिस्पर्धी टीमचा खेळाडू कितीही मोठा असला तरी तो स्लेजिंग करायला घाबरत नसे. सात वर्षांच्या बंदीनंतरही त्याचा हा स्वभाव कायम आहे. या सराव सामन्यात श्रीशांतनं बॅट्समनला चांगलीच खून्नस दिली, तसंच स्लेजिंगही केलं. श्रीशांतच्या स्लेजिंगचा व्हिड़ीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. 2023 वर्ल्ड कप लक्ष्य श्रीशांतनं टाईम्स ऑफ इंडियाला नुकत्याच दिलेल्या मुलाखती 2023 चा वर्ल्ड कप खेळण्याचा विश्वास व्यक्त केला होता. आयपीएल टीमही आपल्याबाबत सकारात्मक असल्याचा त्याचा दावा आहे. “टिनू आणि संजू सॅमसन या दोघांनीही मला गिफ्ट देणार असल्याचं सांगितलं आहे. मी कमबॅक करत आहे, मी फक्त मुश्ताक अली ट्रॉफी पाहणार नाही. मला इराणी तसंच रणजी ट्रॉफी स्पर्धाही खेळण्याची इच्छा आहे. मी चांगला खेळलो तर आणखी संधी मिळतील. मला आयपीएलबद्दल बरीच माहिती मिळत आहे. मी सध्या संपूर्ण फिट असून चांगली बॉलिंग करत आहे,’’ असं श्रीशांतने या मुलाखतीमध्ये म्हंटले आहे. (हे वाचा: विराट, स्मिथला मागं टाकल्यानंतर विल्यमसनची सर्वांचं मन जिंकणारी प्रतिक्रिया) श्रीशांत पुढे म्हणाला की, “ मी फक्त या सिझनचा नाही तर पुढच्या तीन वर्षांचा विचार करत आहे. 2023 चा वर्ल्ड कप हे माझे खरे लक्ष्य आहे. मला वर्ल्ड कप टीममध्ये खेळायचं आहे आणि वर्ल्ड कप जिंकायचा आहे.’’ श्रीशांतची आंतरराष्ट्रीय कामगिरी श्रीशांत 2013 मध्ये राजस्थान रॉयल्स टीमचा सदस्य होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बंदी येण्यापूर्वी त्यानं 27 टेस्टमध्ये 87 विकेट्स घेतल्या आहेत. 2011 चा वर्ल्ड कप तसंच 2007 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमचाही तो सदस्य होता. त्यानं 53 वन-डे मध्ये 75 विकेट्स घेतल्या आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या