श्रीसंत क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणार, या स्पर्धेत खेळणार

श्रीसंत क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणार, या स्पर्धेत खेळणार

आयपीएल (IPL)च्या 2013 सालच्या मोसमात स्पॉट फिक्सिंग प्रकरणी सात वर्षांच्या निलंबनाची कारवाई भोगणारा श्रीसंत ( S Sreesanth) पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.

  • Share this:

मुंबई, 22 नोव्हेंबर : आयपीएल (IPL)च्या 2013 सालच्या मोसमात स्पॉट फिक्सिंग प्रकरणी सात वर्षांच्या निलंबनाची कारवाई भोगणारा श्रीसंत ( S Sreesanth) पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. 2020-21 सालच्या मोसमातच श्रीसंत रणजी ट्रॉफीमधून पुन्हा क्रिकेट खेळणार होता, पण कोरोना व्हायरसमुळे बीसीसीआय (BCCI) ने कोणत्याही स्थानिक क्रिकेटला परवानगी दिली नव्हती. जानेवारी 2021 पासून देशात स्थानिक क्रिकेट सुरू होईल, असं सांगितंल जात असलं, तरी याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही.

स्थानिक क्रिकेट कधी सुरू होणार, याबाबत बीसीसीआयने अजून माहिती दिली नसली, तरी श्रीसंत स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये खेळताना दिसेल. यातून श्रीसंतला केरळच्या रणजी ट्रॉफी टीममध्ये निवड करण्यासाठी दबाव टाकता येऊ शकेल. केरळच्या टी-20 स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी श्रीसंत तयारी करत आहे.

स्पोर्ट्स स्टारने दिलेल्या वृत्तानुसार श्रीसंत अलाप्पुझामध्ये होणाऱ्या केरळ प्रेसिडेंट टी-20 कपमध्ये खेळेल. अनेक राज्यांची बोर्ड स्वत:च्या टी-20 लीगचं आयोजन करतात, आता केरळ क्रिकेट असोसिएशनही ही स्पर्धा भरवणार आहे. या स्पर्धेत श्रीसंत भाग घेणार असल्याचं केरळ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सजन के वर्गीज यांनी स्पोर्ट्स स्टारशी बोलताना सांगितलं.

'श्रीसंत या स्पर्धेचं आकर्षण असेल. प्रत्येक खेळाडू अलाप्पुझाच्या हॉटेलमध्ये बायो बबलमध्ये राहणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही स्पर्धा खेळवली जाऊ शकते. केरळ सरकारकडून परवानगी मिळणं मोठी गोष्ट आहे,' असं वर्गीज म्हणाले,

टी-20 लीगमधली श्रीसंतची कामगिरी त्याला केरळच्या टीममध्ये आणि आयपीएलसाठीही मदत करू शकेल. 2013 सालापासून श्रीसंत क्रिकेटपासून लांब आहे.

2007 टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 वनडे वर्ल्ड कप जिंकलेल्या भारतीय टीमचा श्रीसंत भाग होता. त्याने आल्या कारकिर्दीत 27 टेस्ट, 53 वनडे आणि 10 टी-20 मॅच खेळल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीसंतचं पुनरागमन आता अशक्य वाटत असलं, तरी तो आयपीएलमध्ये एखादी टीम त्याच्यावर बोली लावू शकते.

Published by: Shreyas
First published: November 22, 2020, 5:15 PM IST
Tags:

ताज्या बातम्या