मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

सात वर्षांनंतर श्रीसंत पुन्हा क्रिकेटच्या मैदानात, या टीमकडून खेळणार

सात वर्षांनंतर श्रीसंत पुन्हा क्रिकेटच्या मैदानात, या टीमकडून खेळणार

भारताचा माजी फास्ट बॉलर एस श्रीसंत ( S Sreesanth) पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करत आहे. सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफी (Sayed Mushtaq Ali Trophy) स्पर्धेसाठी केरळच्या 26 खेळाडूंच्या यादीत श्रीसंतची निवड झाली आहे.

    कोची, 16 डिसेंबर : भारताचा माजी फास्ट बॉलर एस श्रीसंत ( S Sreesanth) पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करत आहे. सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफी (Sayed Mushtaq Ali Trophy) स्पर्धेसाठी केरळच्या 26 खेळाडूंच्या यादीत श्रीसंतची निवड झाली आहे. श्रीसंतवर आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी बीसीसीआय (BCCI)ने बंदी घातली होती. केरळने मंगळवारी जाहीर केलेल्या खेळाडूंच्या यादीत श्रीसंतशिवाय संजू सॅमसन, सचिन बेबी, जलज सक्सेना, रॉबिन उथप्पा, बासील थम्पी या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. श्रीसंतवरची बंदी यावर्षी सप्टेंबर महिन्यात संपली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तो 20 ते 30 डिसेंबरमध्ये होणाऱ्या टीमच्या शिबिरात भाग घेईल. याआधी केरळ क्रिकेट संघाकडून आयोजित करण्यात आलेल्या टी-20 स्पर्धेतही श्रीसंतची निवड झाली होती. श्रीसंतने 2011 साली भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं. तसंच 2007 टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताचा विजय झाला तेव्हा श्रीसंत भारतीय टीममध्ये होता. कोरोना व्हायरसमुळे देशातल्या यावर्षीच्या क्रिकेट स्पर्धांची सुरुवात उशीरा होत आहे. 2020-2021 मोसामातली बीसीसीआयची ही पहिली स्पर्धा असेल. श्रीसंतवर घालण्यात आलेली आयुष्यभरासाठीची बंदी कमी करून 7 वर्ष करण्यात आली होती. ही बंदी सप्टेंबर 2020 सालीच संपली होती. पण कोरोनामुळे एकही स्पर्धा झाली नसल्यामुळे श्रीसंतचं पुनरागमनही लांबणीवर पडलं. श्रीसंतने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये 27 टेस्ट, 53 वनडे आणि 10 टी-20 मॅच खेळल्या. संभाव्य खेळाडू रॉबिन उथप्पा, जलज सक्सेना, संजू सॅमसन, विष्णू विनोद, राहुल पी, मोहम्मद अजरुद्दीन, रोहन कुन्नुमेल, सचिन बेबी, सलमान निजार, बासिल थम्पी, एस श्रीसंत, एमडी निधेश, केएम आसिफ, बासिल एनपी, अक्षय चंद्रन, सिजोमोन जोसेफ, मिधुन एस , अभिषेक मोहन, वत्सल गोविंद, आनंद जोसेफ, वीनोप मनोहरन, मिधुन पीके, सरीरूप, अक्षय केसी, रोजिथ, अरुण एम
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या