Home /News /sport /

IND vs AUS : फिट झाला तरी रोहितला दोनच टेस्ट खेळता येणार, कारण...

IND vs AUS : फिट झाला तरी रोहितला दोनच टेस्ट खेळता येणार, कारण...

टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) ऑस्ट्रेलिया (India vs Australia) ला जाणार का नाही? याबाबत अजूनही काही स्पष्ट झालेलं नाही.

    बंगळुरू, 1 डिसेंबर : टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) ऑस्ट्रेलिया (India vs Australia) ला जाणार का नाही? याबाबत अजूनही काही स्पष्ट झालेलं नाही. आयपीएल (IPL 2020) च्या 13 व्या मोसमात खेळताना रोहित दुखापतग्रस्त झाला होता. चार मॅच विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा रोहितने मैदानात पुनरागमन केलं आणि मुंबई (Mumbai Indians) ला विजय मिळवून दिला. तरीही रोहित आयपीएल संपल्यानंतर दुबईवरुन ऑस्ट्रेलियाला जाण्याऐवजी भारतात परत आला. रोहित सध्या एनसीएमध्ये त्याच्या दुखापतीवर उपचार घेत आहे आणि फिट होत आहे. 11 डिसेंबरला रोहितची फिटनेस टेस्ट होणार आहे, यानंतरच त्याचं ऑस्ट्रेलियाला जायचं का नाही हे निश्चित होईल. रोहित शर्माच्या वडिलांना कोरोनाची लागण झाल्यामुळे तो टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला न जाता भारतात परतला होता. त्याच्या वडिलांची तब्येत आता सुधारत आहे. मुंबई मिररमध्ये आलेल्या वृत्तानुसार रोहितवर उपचार करण्याआधी बीसीसीआय आणि एनसीएने तीन सर्जन डॉक्टरांशी चर्चा केली. यानंतर रोहितला शस्त्रक्रिया करायची गरज नसल्याचं समोर आलं. पण रोहित कधी फिट होईल याबद्दल मात्र अजूनही गोष्टी स्पष्ट झालेल्या नाहीत. रोहित जर फिट झाला तर तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध जानेवारी महिन्यात होणाऱ्या शेवटच्या दोन टेस्ट मॅचसाठी उपलब्ध असेल, पण याचा निर्णय 11 तारखेला होईल. 11 डिसेंबरला रोहित फिट झाला तर तो ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. ऑस्ट्रेलिया सरकारच्या नियमानुसार तिकडे पोहोचल्यावर त्याला 14 दिवस क्वारंटाईन होणं बंधनकारक असेल. या परिस्थितीमध्ये रोहितचा क्वारंटाईन कालावधी 26 डिसेंबरच्या आसपास संपेल. टीम इंडियाची पहिली टेस्ट 17 डिसेंबरपासून आणि दुसरी टेस्ट 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे, त्यामुळे तो फिट झाला तर फक्त उरलेल्या दोन टेस्ट मॅचसाठी उपलब्ध असेल.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या