Home /News /sport /

रोहित शर्माच्या जिद्दीचा विराटला फटका, कॅप्टन होण्यापूर्वी BCCI समोर ठेवली होती अट

रोहित शर्माच्या जिद्दीचा विराटला फटका, कॅप्टन होण्यापूर्वी BCCI समोर ठेवली होती अट

रोहित शर्माला यापूर्वी टी20 टीमच्या कॅप्टनपदी नियुक्ती करण्यात आली होती. या टीमची कॅप्टनसी स्वीकारण्यापूर्वी रोहितने बीसीसीआयसमोर अट ठेवली होती, अशी माहिती आता उघड झाली आहे.

    मुंबई, 11 डिसेंबर : रोहित शर्माची (Rohit Sharma) वन-डे टीमच्या कॅप्टनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) पद सोडण्यास तयार नव्हता. बीसीसीआयने त्याला कॅप्टनसी सोडण्यासाठी 48 तासांची मुदत दिली होती. त्यानंतरही विराटने पद सोडण्याची घोषणा न केल्यानं त्याला अखेर दूर करण्यात आले. रोहित आता दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या मालिकेपासून वन-डे टीमचा पूर्णवेळ कॅप्टन असेल. रोहितला यापूर्वी टी20 टीमचंही कॅप्टन करण्यात आले आहे. या टीमची कॅप्टनसी स्वीकारण्यापूर्वी रोहितने बीसीसीआयसमोर अट ठेवली होती, असे वृत्त 'क्रिकबझ' ने दिले आहे. टी20 टीमची जबाबदारी स्वीकारावी अशी बीसीसीआयची इच्छा असेल तर वन-डे टीमच्या कॅप्टनपदीही आपली नियुर्ती व्हावी अशी अट रोहितने ठेवली असल्याचा दावा या वृत्तामध्ये करण्यात आला आहे. यापूर्वी, विराटने टी20 टीमची कॅप्टनसी सोडू नये अशी विनंती केल्याचं वक्तव्य बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी केले होते. विराट कोहलीने टी-20 टीमची कॅप्टनसी सोडू नये, अशी विनंती आम्ही केली होती. मात्र विराट त्याच्या निर्णयावर कायम होता. टी-20 आणि वन-डेसाठी वेगवेगळे कॅप्टन असणं योग्य नाही, असं निवड समितीचं मत झालं. त्यामुळे आम्ही रोहित शर्माच्या नावावर शिक्कामोर्तब केलं, असं गांगुलीने सांगितलं. विराट वन-डे सीरिज खेळणार नाही? भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन टेस्टची सीरिज 26 डिसेंबरपासून होणार आहे. टीम इंडियाच्या टेस्ट टीमचं नेतृत्त्व विराटकडेच आहे. ही सीरिज झाल्यानंतर वन-डे सीरिज होणार आहे. विराट कोहली वन-डे सीरिजमधून माघार घेण्याची शक्यता आहे. मात्र त्याने अद्याप याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. डेव्हिड वॉर्नर बॅटींगला का आला नाही? ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टननं दिलं दुखापतीचं अपडेट रोहित शर्माने त्याच्या कॅप्टनसीमध्ये सर्वांना प्रभावित केले आहे. त्याच्या कॅप्टनसीमध्ये मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेचं पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड विरुद्ध नोव्हेंबर महिन्यात झालेल्या टी20 सीरिजमध्ये टीम इंडियानं 3-0 असा एकतर्फी विजय मिळवला होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BCCI, Rohit sharma, Virat kohli

    पुढील बातम्या