Home /News /sport /

एक-दोन नाही तर लागोपाठ 8 वर्ष! रोहित शर्माने केला हा विक्रम

एक-दोन नाही तर लागोपाठ 8 वर्ष! रोहित शर्माने केला हा विक्रम

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (India vs Australia) वनडे आणि टी-20 सीरिजला दुखापतीमुळे मुकलेल्या रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या नावावर नवा विक्रम झाला आहे. लागोपाठ 8 वर्ष रोहित शर्माने भारतासाठी हे रेकॉर्ड केलं आहे.

    मुंबई, 5 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे आणि टी-20 सीरिजला भारताचा दिग्गज खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे मुकला. आयपीएल (IPL 2020) वेळी रोहितच्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाली होती. रोहित शर्मा हा सध्या बंगळुरूच्या एनसीएमध्ये फिट होत आहे. फिटनेस टेस्ट पास झाल्यानंतर तो ऑस्ट्रेलियाला रवाना होईल, पण अजूनही त्याच्या टेस्ट टीममधल्या समावेशाबाबत शंका आहे, कारण फिटनेस टेस्ट पास झाला तरी रोहितला ऑस्ट्रेलियात जाऊन 14 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे, त्यामुळे तो पहिल्या दोन टेस्ट खेळू शकणार नाही. दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकलेल्या रोहित शर्माच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. लागोपाठ 8 वर्ष रोहित शर्माच्या नावावर भारताच्या सर्वाधिक वनडे स्कोअरची नोंद आहे. यावर्षामध्ये भारत एकूण 9 वनडे मॅच खेळला. यातल्या 3 मॅच ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर असताना, यानंतर न्यूझीलंड दौऱ्यात 3 आणि आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 3 मॅच झाल्या. या 9 मॅचमध्ये भारताकडून तीन शतकं करण्यात आली. यातलं एक शतक रोहित शर्माने, एक केएल राहुलने आणि एक श्रेयस अय्यरने केलं. 2020 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्माने 128 बॉलमध्ये 119 रनची खेळी केली होती. 19 जानेवारीला रोहितने बँगलोरमध्ये हे शतक केलं होतं. श्रेयस अय्यरने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये 107 बॉलमध्ये 103 रनची खेळी केली होती. तर केएल राहुलने न्यूझीलंडविरुद्धच तिसऱ्या वनडेमध्ये 113 बॉलमध्ये 112 रन केले होते. रोहितचा लागोपाठ 8 वर्ष भारतासाठी सर्वाधिक स्कोअर 2013 - 209 (ऑस्ट्रेलियाविरुद्ध) 2014 - 264 (श्रीलंकेविरुद्ध) 2015 - 150 (दक्षिण आफ्रिकेविरुद्ध) 2016 - 171* (ऑस्ट्रेलियाविरुद्ध) 2017 - 208* (श्रीलंकेविरुद्ध) 2018 - 162 (वेस्ट इंडिजविरुद्ध) 2019 - 159 (वेस्ट इंडिजविरुद्ध) 2020 - 119 (ऑस्ट्रेलियाविरद्ध) वनडे क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं करणारा रोहित शर्मा हा एकमेव खेळाडू आहे. 2013, 2014 आणि 2017 साली रोहितने वनडेमध्ये द्विशतकं झळकावली होती. 2014 साली श्रीलंकेविरुद्ध केलेली 264 रनची खेळी आजही आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमधली सगळ्यात मोठी धावसंख्या आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या