टीम इंडियामध्ये निवड न झाल्यानंतर सूर्यकुमार रोहितला काय म्हणाला?

टीम इंडियामध्ये निवड न झाल्यानंतर सूर्यकुमार रोहितला काय म्हणाला?

स्थानिक क्रिकेट आणि आयपीएल (IPL 2020) मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतरही सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याची टीम इंडियामध्ये निवड झाली नाही. यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने सूर्यकुमार यादवला काय वाटलं, याबाबत सांगितलं आहे.

  • Share this:

मुंबई : स्थानिक क्रिकेट आणि आयपीएल (IPL 2020) मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतरही सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याची टीम इंडियामध्ये निवड झाली नाही. आयपीएलच्या या मोसमात सूर्यकुमार जबरदस्त फॉर्ममध्ये होता, त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संधी मिळेल, असं बोललं जात होतं, पण सूर्यकुमारच्या पदरी पुन्हा निराशा आली. तरीही सूर्यकुमार मागे हटला नाही. आयपीएलमध्ये मुंबई (Mumbai Indians) साठी त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आणि आपल्या टीमला पाचव्यांदा ट्रॉफी जिंकवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

मुंबईचा कर्णधार आणि टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्मा (Rohit Sharma) याने सूर्यकुमार यादवला काय वाटलं, याबाबत सांगितलं आहे. 'आम्ही टीम रूममध्ये बसलो होतो, सूर्या निराश होता ते मला जाणवत होतं, पण मी त्याच्याजवळ जाऊन बोलू शकलो नाही. काही वेळानंतर तो माझ्याजवळ आला आणि काळजी करू नकोस, या निराशेतून मी बाहेर येईन आणि मुंबईला मॅच जिंकवून देईन, असं म्हणाला,' अशी प्रतिक्रिया रोहित शर्माने दिली.

टीमची निवड झाल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सूर्यकुमार यादवने धैर्य ठेवलं पाहिजे, असा सल्ला दिला. 30 वर्षांच्या सूर्यकुमारची टीममध्ये निवड न झाल्याबद्दल रोहितलाही असंच वाटत आहे.

दुखापत आणि टीम इंडियाच्या निवडीचा वाद, रोहितने मौन सोडलं

'सूर्यकुमार फक्त आयपीएलच नाही, तर त्याच्या कारकिर्दीमध्येही योग्य दिशेने पुढे जात आहे. त्याची वेळ नक्की येईल,' असं रोहित म्हणाला. सूर्यकुमारने या मोसमात 16 मॅचमध्ये 480 रन केले. सूर्यकुमारच्या या कामगिरीमुळे मुंबईने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. लागोपाठ तीन मोसमात 400 पेक्षा जास्त रन करणारा सूर्यकुमार पहिला अनकॅप खेळाडू (भारताकडून न खेळलेला) ठरला आहे.

Published by: Shreyas
First published: November 21, 2020, 5:45 PM IST
Tags:

ताज्या बातम्या