• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup: श्रीसंत कॅच घेत होता तेव्हा युवराजनं का मिटले होते डोळे? रोहितनं सांगितली आठवण VIDEO

T20 World Cup: श्रीसंत कॅच घेत होता तेव्हा युवराजनं का मिटले होते डोळे? रोहितनं सांगितली आठवण VIDEO

2007 च्या टी20 वर्ल्ड कप फायनलमध्ये जोगिंदर शर्मानं (Joginder Sharma) शेवटची ओव्हर टाकली होती. त्याच्या बॉलिंगवर मिसबाह उल हकचा कॅच श्रीसंतनं (S Sreesanth) पकडला आणि टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकला

 • Share this:
  मुंबई, 23 ऑक्टोबर:  T20 वर्ल्ड कपमध्ये (ICC T20 World Cup 2021) आता प्रत्येक क्रिकेट फॅन्सचं लक्ष भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचकडं आहे. या वर्ल्ड कपमध्ये दोन्ही देशांमध्ये झालेल्या मॅचवर टीम इंडियाचं एकतर्फी वर्चस्व आहे. 2007 साली भारताने पाकिस्तानला हरवूनच पहिल्या टी20 वर्ल्ड कपचं (T20 World Cup 2007) विजेतेपद पटकावलं होतं. त्यावेळी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वाखालील टीमनं फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव केला होता. 2007 च्या टी20 वर्ल्ड कप फायनलमध्ये जोगिंदर शर्मानं  (Joginder Sharma) शेवटची ओव्हर टाकली होती. त्याच्या बॉलिंगवर मिसबाह उल हकचा कॅच श्रीसंतनं (S Sreesanth) पकडला आणि टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकला.  तो क्षण भारतीय फॅन्सना आजही चांगलाच लक्षात आहे.  रोहित शर्मा (Rohit Sharma) 2007 साली वर्ल्ड कप जिंकणाऱ्या त्या टीमचा सदस्य होता. रोहितनं त्या ऐतिहासिक क्षणाच्या आठवणी आयसीसीच्या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितल्या आहेत. त्याचबरोबर त्याबाबतचा एक खास किस्सा देखील शेअर केलाय. रोहितनं सांगितलं की, '2007 च्या टी20 वर्ल्ड कप फायनलमध्ये तो कव्हरला फिल्डिंग करत होता आणि युवराज पॉईंटवर होता. त्यावेळी जोगिंदरनं शेवटच्या ओव्हरचा तिसरा बॉल टाकला. त्या बॉलवर मिसाबहनं फाईन लेगच्या वरुन स्कूप शॉट खेळला. तिथं श्रीशांत उभा होता. पॉईंटवर उभ्या असलेल्या युवराजनं त्या बॉलकडं पाहिलं देखील नाही. कदाचित युवराजला श्रीशांत कॅच घेईल याचा विश्वास नव्हता.'
  View this post on Instagram

  A post shared by ICC (@icc)

  श्रीसंतच्या करिअरमधील तो सर्वात दबावाच्या क्षणांपैकी एक क्षण होता, असं रोहितनं सांगितलं. त्याचबरोबर त्या कॅचमुळे आम्ही वर्ल्ड कप जिंकलो. त्यामुळे तो माझ्या करिअरमधील सर्वात चांगला क्षण असल्याचं त्यानं स्पष्ट केलं. टीम इंडियाला 2007 नंतर आजवर एकदाही टी20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही.  रोहित शर्मा आता या वर्ल्ड कपमधील टीम इंडियाचा व्हाईस कॅप्टन आहे. आजवरच्या सर्व टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळणारा तो एकमेव भारतीय आहे. टीम इंडियाला हा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी रोहितला निर्णायक भूमिका पार पाडावी लागणार आहे. T20 World Cup 2021, IND vs PAK : 24 तास आधीच पाकिस्ताननं जाहीर केली टीम, पाहा कुणाला मिळाली संधी
  Published by:News18 Desk
  First published: