Home /News /sport /

रोहित शर्मानं कॅप्टन झाल्यानंतर विराट कोहलीबद्दल दिली पहिली प्रतिक्रिया! VIDEO

रोहित शर्मानं कॅप्टन झाल्यानंतर विराट कोहलीबद्दल दिली पहिली प्रतिक्रिया! VIDEO

रोहित शर्मा (Rohit Sharma) आता मर्यादीत ओव्हर्स टीमचा कॅप्टन बनला आहे. रोहितनं कॅप्टन झाल्यानंतर पहिल्यांदाच विराट कोहली (Virat Kohli) बद्दल पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबई, 13 डिसेंबर : रोहित शर्मा (Rohit Sharma) आता मर्यादीत ओव्हर्स टीमचा कॅप्टन बनला आहे. रोहितला यापूर्वी टी20 टीमचा पूर्णवेळ कॅप्टन करण्यात आले होते. त्यानंतर त्याच्याकडे वन-डे टीमची देखील जबाबदारी सोपण्यात आली आहे. विराट कोहली (Virat Kohli) आता फक्त टेस्ट टीमचाच कॅप्टन आहे. रोहितनं कॅप्टन झाल्यानंतर पहिल्यांदाच विराट कोहलीच्या कॅप्टनसीवर प्रतिक्रिया दिली आहे. विराट 2017 साली मर्यादीत ओव्हर्सच्या टीमचा पूर्णवेळ कॅप्टन झाला होता रोहित शर्माच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ बीसीसीआयनं शेअर केला असून त्यामध्ये त्याने विराटच्या कॅप्टनसीबद्दल मत व्यक्त केले आहे. रोहित यावेळी म्हणाला की, ' विराट कोहलीनं 5 वर्ष टीमचं नेतृत्त्व केले. त्याने प्रत्येक मॅचमध्ये सर्वश्रेष्ठ योगदान देण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण टीमने देखील तोच प्रयत्न केला. त्याच्या कॅप्टनसीमध्ये खेळण्याचा अनुभव आमच्यासाठी जबरदस्त होता. आम्ही एकत्र भरपूर क्रिकेट खेळलं आहे. तसेच प्रत्येक क्षण आणि संधीचा आनंद घेतलाय. आम्ही पुढे देखील तेच करतो. एक टीम म्हणून अधिक चांगलं होण्यासाठी आमचा पूर्ण फोकस असेल. बाहेर कोण काय बोलतंय याची एक खेळाडू म्हणून मी पर्वा करत नाही. लोकांच्या बोलण्यावर मी नियंत्रण आणू शकत नाही. या सर्व गोष्टींचा विचार न करता आमची टीम खेळावर लक्ष केंद्रीत करते. त्यामुळेच मॅच जिंकणे शक्य होते,' असे रोहितने स्पष्ट केले. द्रविडची घेणार मदत रोहितने या मुलाखतीमध्ये टीममधील सदस्यांमध्ये भक्कम नातं निर्माण करण्यावर भर दिला आहे. आम्हाला खेळाडूंमध्ये भक्कम नातं निर्माण करायचं आहे. त्यामुळे आम्हाला लक्ष्य गाठण्यात मदत होईल. त्यासाठी राहुल भाई (द्रविड) आम्हाला मदत करेल. मॅच जिंकण्यासाठी आम्हाला फोकस करायचा आहे. त्यासाठी ज्या गोष्टीसाठी खेळाडू ओळखले जातात तसा खेळ करणे आवश्यक आहे. माझ्या मते, बाहेरच्या गोष्टींना फार महत्त्व नाही. खेळाडू एकमेकांबद्दल काय विचार करतात हेच अखेर सर्वात महत्त्वाचे असते.' असे रोहितने सांगितले. T20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीशी काय चर्चा झाली? बाबर आझमनं दिलं उत्तर
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, Rohit sharma, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या