Home /News /sport /

कॅप्टन रोहित शर्माची तयारी सुरू, दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वीचा VIDEO VIRAL

कॅप्टन रोहित शर्माची तयारी सुरू, दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वीचा VIDEO VIRAL

टीम इंडियाचा अनुभवी ओपनर रोहित शर्मा (Rohit Sharma) दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India tour of South Africa) वन-डे टीमची कॅप्टनसी करणार आहे. नवी जबाबदारी मिळताच त्याने तयारी सुरू केली आहे.

  मुंबई, 11 डिसेंबर : टीम इंडियाचा अनुभवी ओपनर रोहित शर्मा (Rohit Sharma) दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India tour of South Africa) वन-डे टीमची कॅप्टनसी करणार आहे. नवी जबाबदारी मिळताच त्याने तयारी सुरू केली आहे. रोहितनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यामध्ये तो प्रॅक्टीस करताना दिसत आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिली टेस्ट 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तीन टेस्टची सीरिज झाल्यानंतर वन-डे सीरिज खेळवण्यात येईल. रोहितने इन्स्टाग्रामवर व्हिडओ पोस्ट केलाय. त्या व्हिडीओला त्याने '3, 2 आणि 1... सुरूवात करत आहे.' असं कॅप्शन दिलं आहे. रोहितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याच्यावर सध्या कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडतोय. या व्हिडीओमध्ये रोहित बॅटींग प्रॅक्टीस करत आहे.
  विराट कोहलीनं (Virat Kohli) टी20 वर्ल्ड कपनंतर या प्रकारातील कॅप्टनसी सोडली. त्यानंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील टी20  सीरिजपूर्वी रोहित या टीमचा पूर्णवेळ कॅप्टन झाला. रोहितने या सीरिजमध्ये भारतीय टीमचं दमदार नेतृत्त्व केले. त्यामुळे टीम इंडियाने न्यूझीलंडचा 3-0 असा पराभव केला. त्यानंतर झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये रोहितला विश्रांती देण्यात आली होती. ऑस्ट्रेलियन बॉलरला 328 दिवसानंतर मिळाली पहिली विकेट, मोठ्या रेकॉर्डची नोंद दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी वन-डे टीम अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र रोहित शर्मा या टीमचा कॅप्टन असेल असे निवड समितीनं यापूर्वीच जाहीर केले आहे. त्याचबरोबर अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) हटवत रोहितला टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन करण्यात आले आहे. यापूर्वीच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील टेस्ट सीरिजमध्ये रोहित अपयशी ठरला होता. त्यामुळे त्याच्यासाठी आगामी टेस्ट सीरिज महत्त्वाची आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Cricket news, Rohit sharma, Team india, Video viral

  पुढील बातम्या