मुंबई, 27 मे : टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माने (Rohit Sharma) सोशल मीडियावर (Social Media) शेअर केलेल्या फोटोने क्रिकेट फॅन्सचे मन जिंकले आहे. अगदी कमी शब्दात रोहितनं हा फोटो शेअर करत क्रिकेट फॅन्सच्या भावना मांडल्याची भावना व्यक्त होत आहे. जगप्रसिद्ध अमेरिकन टेलिव्हिजन शो फ्रेंड्स (Friends) पुन्हा सुरु होत आहे. त्याचा विशेष भाग नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टेलिव्हजन शोची जगभर अमाप लोकप्रियता आहे. तब्बल 17 वर्षांनी याचा विशेष भाग (Friends Reunion) प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तो विषय ट्रेंडिंग आहे. रोहित शर्माने देखील या ट्रेंडिग विषयावर एक फोटो शेअर केला आहे.
रोहित शर्माने जो फोटो शेअर केलाय त्यामध्ये प्रेक्षकांनी गच्च भरलेले हे मैदान असून या मैदानातील सर्व प्रेक्षक टीम इंडियाचा उत्साह वाढवत आहेत.या सर्व प्रेक्षकांना रोहित दोन्ही हात उंचावून अभिवादन करत आहे. F.R.I.E.N.D.S. या रियुनियनची मी वाट पाहतोय, असं कॅप्शन रोहितने या फोटोला दिले आहे.
कोरोना व्हायरसमुळे क्रिकेटचे स्वरुप बदलले आहे. आता बहुतेक क्रिकेट सामने हे प्रेक्षकांच्या उपस्थिती शिवाय होत आहेत. आपल्या आवडत्या खेळाडूंना मैदानात पाहण्याची त्यांना पाठिंबा देण्याचे क्षण सध्या सर्व क्रिकेट फॅन्स मिस करतायत. रोहितचं हे ट्विट त्याच सर्व फॅन्सना समर्पित आहे.त्यामुळे ते सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत आहे.
......, this is the reunion I am waiting for! pic.twitter.com/nGBhDA6yM4
— Rohit Sharma (@ImRo45) May 27, 2021
पाकिस्तानच्या माजी कर्णधारालाही पडली बुमराहच्या खेळीची भूरळ, वासीम-वकारशी केली तुलना
खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्याने बीसीसीआयला आयपीएल स्पर्धा (IPL 2021) देखील स्थगित करावी लागली. रोहित आयपीएलमधील मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) टीमचा कॅप्टन आहे. इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियामध्येही रोहितची निवड झाली आहे. या दौऱ्यासाठी आवश्यक असलेला क्वारंटाईन कालावधी तो सध्या मुंबईतील हॉटेलमध्ये पूर्ण करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Photo viral, Rohit sharma, Social media, Team india