मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

रोहित शर्मा फिट का अनफिट? सौरव गांगुलीने दिली महत्त्वाची माहिती

रोहित शर्मा फिट का अनफिट? सौरव गांगुलीने दिली महत्त्वाची माहिती

भारताचा क्रिकेटपटू रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या दुखापतीबाबत बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने महत्त्वाची माहिती दिली आहे.

  • Published by:  Shreyas

कोलकाता : भारताचा क्रिकेटपटू रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या दुखापतीबाबत बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने महत्त्वाची माहिती दिली आहे. आयपीएल (IPL 2020) मध्ये रोहितने लागोपाठ तीन मॅच खेळून मुंबई (Mumbai Indians)ला ट्रॉफी जिंकवून दिली असली तरी तो 70 टक्के फिट असल्याचं सौरव गांगुली म्हणाला आहे. द वीक ला सौरव गांगुलीने मुलाखत दिल्याचं वृत्त इएसपीएन क्रिकइन्फोने दिलं आहे.

रोहित शर्मा त्याच्या फ्रॅन्चायजीकडून खेळतो, पण त्याला फिट नसल्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नेलं जात नाही, हे कसं? हा प्रश्न सौरव गांगुलीला विचारला तेव्हा, याबाबत तुम्ही रोहित शर्मालाच विचारा, असं उत्तर त्याने दिलं. तो 70 टक्के फिट असल्यामुळेच त्याची वनडे आणि टी-20 टीममध्ये निवड झाली नाही, असं गांगुलीने सांगितलं.

आयपीएलमध्ये 18 ऑक्टोबरला पंजाब (KXIP)विरुद्धच्या मॅचवेळी रोहितच्या डाव्या मांडीला दुखापत झाली होती. यानंतर पुढच्या 4 मॅचमध्ये रोहित खेळला नव्हता, पण उरलेल्या तीन मॅचमध्ये रोहित मैदानात उतरला. आयपीएलच्या फायनलमध्येही रोहितने अर्धशतकी खेळी करून मुंबईला जिंकवून दिलं. भारतीय टीममध्ये निवड झालेली नसतानाही रोहित शर्मा सरावासाठी मैदानात उतरला यावरुनही मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती. रोहित भारताकडून खेळण्यासाठी फिट नाही, मग तो सराव कसा करत आहे? असा प्रश्न सोशल मीडियावरुन विचारण्यात आला होता.

सुरुवातीला रोहित शर्माची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झालेली नव्हती, पण नंतर त्याला टेस्ट टीममध्ये निवडण्यात आलं. बंगळुरूच्या एनसीएमध्ये रोहितवर उपचार करण्यात येणार आहेत. यानंतर रोहित ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. 17 डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या टेस्ट सीरिजला सुरुवात होणार आहे. ऍडलेडमध्ये होणारी ही पहिली टेस्ट डे-नाईट असणार आहे. ही टेस्ट झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली पितृत्वाच्या सुट्टीसाठी भारतात परतणार आहे, त्यामुळे तो उरलेल्या तीन टेस्ट मॅचना मुकणार आहे.

First published: