World Cup मध्ये शमी-जडेजा यांच्यामुळे रोहित-विराटचं बिनसलं?

World Cup नंतर भारतीय संघात फूट पडल्याची चर्चा सुरू असून त्याला शमी आणि जडेजा यांची निवड कारणीभूत ठरल्याचं गल्फ न्यूजने म्हटलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 23, 2019 09:17 AM IST

World Cup मध्ये शमी-जडेजा यांच्यामुळे रोहित-विराटचं बिनसलं?

ICC Cricket World Cupमध्ये भारताला सेमीफायनलमध्ये पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर आता भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. मात्र, भारतीय संघात फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबतचे वृत्त गल्फ न्यूजने दिलं आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे.

वर्ल्ड कपनंतर भारताच्या संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा असे दोन गट पडल्याची चर्चा रंगली आहे. कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री चर्चा न करता निर्णय घेतात, त्यामुळं संघाचे नुकसान होत आहे. त्यामुळं रोहितकडे संघाचे कर्णधारपद सोपवले जाईल अशी चर्चा होती. मात्र निवड समितीनं विराटकडेच संघाचे कर्णधार पद दिले आहे.

गल्फ न्यूजनं प्रसिध्द केलेल्या बातमीनुसार, सेमीफायनलमध्ये भारताच्या पराभवाला विराट कोहलीचे जबाबदार असल्याचे मत रोहितनं व्यक्त केले होते. विराटच्या नेतृत्वाखाली भारतानं मोठी स्पर्धा जिंकलेली नाही. त्यामुळे त्याला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी करण्यात रोहितनं केली होती.

सुत्रांच्या माहितीनुसार क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांचा कर्णधार विराट कोहलीला पाठींबा आहे. त्यामुळेच आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत पराभव होऊनही विराटवर कारवाई करण्यात आली नव्हती, असा आरोप करण्यात आला होता.

दरम्यान, गल्फ न्यूजने आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. रोहित आणि विराट यांच्यात मतभेद झाले ते सेमीफायनलमध्ये शमीला बाहेर बसवण्याच्या निर्णयामुळे. शमीने चार सामन्यात 14 विकेट घेतल्या असताना त्याला बाहेर बसवला.

Loading...

शमीशिवाय रविंद्र जडेजालासुद्धा सुरुवातीपासून संधी न दिल्यानं रोहितने प्रश्न उपस्थित केला होता असं गल्फ न्यूजने म्हटलं आहे. सेमीफायनलमध्ये रविंद्र जडेजाने केलेल्या खेळीमुळे भारताचा निसटता पराभव झाला. तसेच जेव्हा जडेजा मैदानात होता तेव्हा रोहित शर्मा त्याला प्रोत्साहन देत असल्याचंही दिसत होतं.

वर्ल्ड कपदरम्यान कोहलीच्या विश्रांतीची चर्चा महिनाभर सुरू होती. मात्र अचानक असं काय झालं की त्यानं विश्रांती न घेता वेस्ट इंडीज दौऱ्यात खेळण्याचा निर्णय घेतला.दरम्यानच्या काळात वर्ल्ड कपमधील भारताच्या पराभवाने कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्न विचारले जात होते. अशावेळी कर्णधार म्हणून संघात पुनरागमन करणं कोहलीसमोर आव्हानात्मक ठरलं असतं म्हणूनच त्यानं वेस्ट इंडीज दौऱ्यावर विश्रांती घेतली नाही असं म्हटलं जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2019 09:17 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...