मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /'रोहित शर्मा लवकरच टीम इंडियाचा कॅप्टन होणार', निवड समितीच्या माजी अध्यक्षांचा दावा

'रोहित शर्मा लवकरच टीम इंडियाचा कॅप्टन होणार', निवड समितीच्या माजी अध्यक्षांचा दावा

रोहित शर्मा (Rohit Sharma) लवकरच टीम इंडियाचा कॅप्टन होईल, असा दावा राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष किरण मोरे (Kiran More) यांनी केला आहे.

रोहित शर्मा (Rohit Sharma) लवकरच टीम इंडियाचा कॅप्टन होईल, असा दावा राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष किरण मोरे (Kiran More) यांनी केला आहे.

रोहित शर्मा (Rohit Sharma) लवकरच टीम इंडियाचा कॅप्टन होईल, असा दावा राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष किरण मोरे (Kiran More) यांनी केला आहे.

मुंबई, 28 मे : आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी टीम असलेल्या मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) लवकरच टीम इंडियाचा कॅप्टन होईल, असा दावा राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष किरण मोरे (Kiran More) यांनी केला आहे. रोहित शर्माला टीम इंडियाच्या वन-डे आणि टी-20 टीमचा कॅप्टन करावे अशी मागणी यापूर्वी देखील अनेकदा करण्यात आली आहे. रोहितला कॅप्टन करण्याची वेळ आता आली आहे, असे मत मोरे यांनी 'इंडिया टीव्ही' शी बोलताना व्यक्त केले आहे. टेस्ट आणि वन-डे टीमसाठी वेगळे कॅप्टन (split captaincy) करण्याची पद्धत लवकरच टीम इंडियात सुरु होईल, असे भविष्य मोरे यांनी वर्तवले आहे.

इंग्लंड दौऱ्यानंतर निर्णय

किरण मोरे यांनी सांगितले की, "विराट कोहली त्याच्या करियरमधील मोठा भाग महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) कॅप्टनसीमध्ये घालवला आहे. तो नजीकच्या भविष्यात रोहितसोबत जबाबदारी शेअर करण्याचा विचार करु शकतो. बीसीसीआयचे व्हिजन देखील या विचारांना बळ देणार आहे. रोहित शर्माला लवकरच संधी मिळेल. कोहली एक हुशार कॅप्टन आहे. तो धोनीच्या कॅप्टनसीमध्ये खेळला आहे. वन-डे आणि टी20 टीमची कॅप्टनसी आणखी किती दिवस करायची याचा विचार तो करेल. इंग्लंड दौऱ्याच्या नंतर याबाद्दलचा निर्णय होऊ शकतो." असे संकेत मोरे यांनी दिले आहेत.

मोरेंनी पुढे म्हणाले की, "स्पिल्ट कॅप्टनसीचा प्रयोग भारतामध्ये यशस्वी होऊ शकतो. टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू काय विचार करतात हे महत्त्वाचे आहे. विराट कोहलीसाठी एकाच वेळी तीन टीमची कॅप्टनसी करणे सोपे नाही. त्याचबरोबर त्याला देखील चांगली कामगिरी करायची आहे. तीन्ही टीमची कॅप्टनसी करणे आणि टीमला विजय मिळवून देताना चांगल्या खेळाच्या प्रदर्शनासाठी मी विराटला श्रेय देतो. पण आता लवकरच रोहितला कॅप्टन करा, असे विराट स्वत: सांगेल."

'तुम्ही मोठे का झाला?', धोनीचा Throwback Photo शेअर करत साक्षीनं विचारला प्रश्न

" हा भारतीय क्रिकेटसाठी सकारात्मक संदेश असेल. रोहित शर्मा चांगली कामगिरी करत असेल, तर त्याला संधी मिळावी. माझ्या मते विराट कोहली याचे उदाहरण घालून देईल. आपल्याला किती आराम करायचा आहे. टेस्ट आणि वन-डे टीमची कॅप्टनसी करायची आहे का?, हे विराटने ठरवणे आवश्यक आहे. तो देखील माणूस आहे. त्याला देखील मानसिक थकवा येतो." असे मोरे यांनी स्पष्ट केले.

First published:
top videos

    Tags: Cricket, Rohit sharma, Team india, Virat kohli