विराट-रोहित एकमेकांशी बोलतही नाहीत, BCCIने शेअर केलेल्या व्हिडिओची चर्चा

विराट-रोहित एकमेकांशी बोलतही नाहीत, BCCIने शेअर केलेल्या व्हिडिओची चर्चा

वर्ल्ड कपमधील पराभवानंतर विराट आणि रोहित यांच्यात मतभेद असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. आता पुन्हा एकदा ही चर्चा सुरू झाली आहे.

  • Share this:

लंडन, 05 ऑगस्ट : भारताचा वर्ल्ड कपमध्ये पराभव झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात मतभेद असल्याची चर्चा झाली होती. त्यावर दोघांनीही असं काही नसल्याचं सांगितलं. कोहलीनं ड्रेसिंगरूममध्ये वातावरण चांगलं असल्याचं म्हटलं होतं. मात्र, तरीही दोघांमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरूच आहे.

सध्या भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर आहे. दौऱ्यावर जाण्यापूर्वीच कर्णधार कोहलीने रोहित शर्मासोबत मतभेद नसल्याचं स्पष्ट केलं होतं. दरम्यान, आता बीसीसीआय़नं एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये स्पष्टपणे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात दुरावा असल्याचं जाणवतं असं चाहत्यांनी म्हटलं आहे.

फ्लोरिडात झालेल्या पहिल्या टी20 सामन्यानंतर दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांना भेटले. यावेळी विराट आणि रोहित यांच्यातील दुरावा स्पष्टपणे दिसला. विंडीजच्या खेळाडूंना भेटण्यासाठी रोहित पहिल्यांदा आला. त्यानंतर विराट कोहलीने भेट घेतली. या भेटीवेळी दोघांनी एकमेकांसमोर येणं टाळलं.

 

View this post on Instagram

 

And that's a wrap from Florida 💙💙 We now head to Guyana next ✈️ #TeamIndia #WIvIND

A post shared by Team India (@indiancricketteam) on

वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलनंतर प्रेझेंटेशन सेरेमनीला उपस्थित राहतानासुद्धा विराट सर्वांना भेटला होता. मात्र, त्यानं रोहित शर्माकडे न पाहताच निघून गेल्यानं दुराव्याची चर्चा सुरू झाली होती.

कलम 370 विधेयकावर आठवलेंची राज्यसभेत कविता, पाहा हा VIDEO

Published by: Suraj Yadav
First published: August 5, 2019, 3:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading